Sonakshi Sinha Wedding : सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात काय असणार ड्रेस कोड?

 सोनाक्षी सिन्हा
सोनाक्षी सिन्हा

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनाक्षी सिन्हा आपला लॉन्गटाईम बॉयफ्रेंड जहीर इकबालसोबत विवाह करणार आहे. सोनाक्षीने याआधी सार्वजिनकपणे आपल्या प्रेमाचा खुलासा केला आहे. सोनाक्षी सिन्हाने एका इंग्रजी वेबसाईटशी केलेल्या बातचीतमध्ये सांगितले, "जेव्हा माझे लग्न होईल, तेव्ही मला एक क्लासिक लाल लहंगा परिधान करायला आवडेल." यावेळी अभिनेत्रीच्या लग्नातील पोषाख एक रहस्य गोष्ट असते. पण, आता सोनाक्षीच्या लग्नातील ड्रेसकोड काय असणार, हे उघडकीस आले आहे. सोनाक्षी आणि तिचा बॉयफ्रेंड जहीर इकबालच्या लग्नाच्या मुख्य कार्यक्रमाची थीम काय असेल.

अधिक वाचा –

दोघांचे लग्न २३ जून रोजी होणार आहे आणि मुंबईतील बेस्टियन – ॲट द टॉपमध्ये एक भव्य कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. कार्यक्रमात या लव्हबर्ड्सचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सहभागी होतील. एका सूत्रानुसार, कार्यक्रमासाठी ड्रेस कोड एक "उत्सव आणि औपचारिक" आहे.

सोनाक्षी -जहीरच्या लग्नाचा उत्सव २२ जून रोजी जुहूमध्ये घरी सुरू होईल. २३ जूनला सकाळी लग्न आणि रिसेप्शन सायंका‍ळी असेल. या कपलच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर लिहिलंय-अफवा खऱ्या आहेत.

अधिक वाचा –

तिच्या लग्नाची तयारी बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे. निवडणूकनंतर आता सोनाक्षीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. कारण, सोनाक्षीचे वडील, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पश्चिम बंगालमधील आसनसोलमधून निवडणूक लढवली होती. तयांनी ही निवडणूक जिंकली देखील. आता दुहेरी आनंद सिन्हा परिवार साजरा करत आहे. डबल एक्सएल (२०२२) चित्रपटामध्ये सोनाक्षी आणि जहीर दोघांना सलमान खानने लॉन्च केलं होतं. तर जहीरचा पहिला चित्रपट नोटबुकची निर्मिती सलमानने केली होती. आता अभिनेत्रीने सलमान सोबत दबंग मधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news