पुढारी ऑनलाईन डेस्क : रहना है तेरे दिल है मधून लोकप्रिय झालेला आर माधवनचे कोल्हापूरशी जवळचे ऋणानुबंध आहेत. काही काळ कोल्हापुरात वास्तव्यास असलेल्या आर माधवनला कोल्हापूरची मिसळ प्रचंड आवडते. मिसळीचा कट अख्ख्या जगात मिळत नाही, असे गोडवे गाणारा आर माधवन कोल्हापुरच्या अनेक चविष्ट पदार्थांचा चाहता आहे. आज १ जून रोजी आर माधवनचा वाढदिवस आहे. त्याचे कोल्हापूरशी नातं कसं होतं, जाणून घेऊया…
कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात शिक्षणासाठी आलेल्या आर माधवनच्या कोल्हापूरशी निगडित अनेक गोड आठवणी आहेत, त्याने त्या वेळोवेळी अनेक मुलाखतीत, चर्चा आणि गप्पांमध्ये बोलून दाखवल्या आहेत. एकदा गाडीतून प्रवास करताना त्याने कोल्हापूरच्या झणझणीत मिसळीची आठवण सांगितली होती. तो म्हणाला होता, कोल्हापूरची बातचं न्यारी आहे. तिथल्या मिसळीचा जो कट आहे ज्याला रस्सा म्हणतात, तो अख्ख्या जगात कुठेही मिळणार नाही. तसा कट मुंबई, पुणे येथेही तयार होत नाही, कोल्हापूरचा जो 'कट' आहे, तो 'कट' वेगळाच आहे. कट खाल्ल्यावर झिणझिण्या येतात. पण त्याची टेस्ट खूप कमालीची आहे. कधी कोल्हापूरला येणे झाले तर मिसळवर ताव मारतोच.
अधिक वाचा –
तसं पाहिलं तर तो पाच वर्षे कोल्हापूरमध्ये वास्तव्यास होता, असे म्हटले जाते. तो तसा दक्षिणेतला पण महाराष्ट्राशी त्याचं नातं जुनं आहे. इलेक्ट्रॉनिक्सच्या उच्च शिक्षणासाठी तो कोल्हापुरात आला. शिवाजी विद्यापीठाजवळच्या राजाराम महाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला. राहायला एका हॉस्टेलला असल्यामुळे कोल्हापूरच्या बॉईज हॉस्टेलचे जीवन त्याने चांगलेच अनुभवले आहे. शिवाय एका भाड्य़ाच्या खोलीत देखील तो काही काळ राहायला असल्याचे म्हटले जाते. अभ्यासासाठी तो शिवाजी विद्यापीठाच्या ग्रंथालयात जात असल्याच्या आठवणी सांगितली जाते.
अधिक वाचा –
इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी मिळवल्यानंतर आर. माधवनने पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि पब्लिक स्पीकिंगचे वर्ग सुरु केले. त्यावेळी कोल्हापुरात एका कार्यशाळेवेळी सरिता बिर्जे भेटली.
तिला एअरहोस्टेस व्हायचं होतं. तिने माधवनच्या वर्गाला प्रवेश घेतला आणि एअरहोस्टेसची मुलाखत पास केली.
यानंतर तिने माधवनचे आभार मानले आणि जेवणासाठी आमंत्रण दिलं. येथून सुरु झाली माधवनची 'लव्ह स्टोरी.'
आर. माधवन आणि सरीताने ८ वर्षांच्या डेटिंगनंतर १९९९ मध्ये लग्न पारंपरिक तमिळ पद्धतीने केले. आर. माधवन-सरिताला २००५ मध्ये मुलाचा जन्म झाला. त्याचे नाव वेदांत ठेवले.
अधिक वाचा-