हिरामंडीतील ‘साइमा’ अभिनेत्री श्रुती शर्मा आहे तरी कोण?

श्रुती शर्मा
श्रुती शर्मा

पुढारी ऑनलाईन डेस्क : वेब सीरीज 'हिरामंडी'ची खूप चर्चा आहे. संजय लीला भन्साळीने यामध्ये स्वातंत्र्याच्या आधी खूप भव्य अंदाजात दाखवलं आहे. सीरीजसोबत टीव्ही अभिनेत्रींची अदाकारी देखील खूप कौतुक होत आहे. आता चर्चा आहे ती, हिरामंडीतील साइमाच्या भूमिकेची. श्रुती शर्मा या टीव्ही अभिनेत्रीने साइमाची भूमिका साकारली आहे. तिने श्रुती शर्माने न केवळ या भूमिकेत जीव ओतला आहे. तिला ही भूमिका कशी मिळाली, याबद्दलचा एक इंटरेस्टिंग किस्सा तिने सांगितला.

अधिक वाचा-

एका पॉडकास्ट दरम्यान बोलताना श्रुती शर्माने सांगितलं की, एक दिवस ती आपल्या टीव्ही शोच्या सेटवर शूटिंगसाठी तयार झाली होती आणि विचार करत होती की, मी खरंच संजय लीला भन्साळींच्या चित्रपटांतील पात्रांप्रमाणे दिसत आहे. मलादेखील त्यांनी कास्ट केलं असतं तर… आणि हा चमत्कार आहे की, केवळ एका महिन्याच्या आत मला हिरामंडीसाठी कास्ट करण्यात आलं.

श्रुती शर्मा म्हणाली, हा माझ्या आयुष्यातील सर्वात उत्कृष्ट भाग आहे. खरंतर, जेव्हा श्रुतीला या भूमिकेच्या ऑडिशनसाठी कॉल आला, तेव्हा ती टीव्ही मालिका नमक इश्क का च्या शूटिंगमध्ये बिझी होती.

अधिक वाचा-

श्रुती शर्माने सांगितला 'साइमा' च्या निवडीचा किस्सा

श्रुतीने सांगितलं की, मला श्रुती महाजन यांच्या टीममधून कॉल आला, त्यांनी सांगितलं की, एक भूमिका आहे आणि अभिनयासोबत एक गाणेदेखील अशणार आहे. तेव्हा मला कल्पनादेखील नव्हती की, ऑडिशन कोणत्या चित्रपटासाठी आहे. श्रुतीने सांगितलं की, मी सामान्य ऑडिशन प्रमाणे हीदेखील ऑडिशन दिली आणि माझी निवड झाली. यानंतर मला समजलं की, हे ऑडिशन संजय लीला भन्साळींच्या प्रोजेक्टसाठी आहे.

अधिक वाचा-

श्रुतीने आपल्या पात्राबद्दल सांगितले की, यानंतर दुसरा राऊंड झाला. वाचन झाले आणि मला साइमा या भूमिकेसाठी निवडण्यात आले. मला अद्यापही विश्वास होत नाही की, खरंच असे झाले आहे. मी संजय सरांच्या हिरामंडीमध्ये काम केलं आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news