राखी सावंतची प्रकृती अचानक बिघडल्याने रुग्णालयात दाखल | पुढारी

राखी सावंतची प्रकृती अचानक बिघडल्याने रुग्णालयात दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडमधील ड्रामा क्वीन राखी सावंत सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. पण, आता राखी वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. राखी सावंतची अचानक प्रकृती बिघडल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राखीला नेमकं काय झालंय?

तिला हृदयाशी संबंधित आजार झाल्यामुळे रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयातून तिचा फोटो समोर आला असून ती बेडवर दिसते. नर्स तिचा रक्तदाब तपासताना दिसत आहे. तिच्या एका बोटाला पल्स ऑक्सिमीटरदेखील लावलेला दिसतोय.

सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो व्हायरल

विरल भयानी यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोला कॅप्शन देत त्यांनी लिहिलं, ”हृदयाशी संबंधित काही आजारामुळे राखीला ताबडतोब रुग्णालयात दाखल करावं लागंल असं दिसतंय. डॉक्टरांकडून पुढील माहिती येण्याची आम्ही वाट पाहत आहोत. ती लवकर बरी व्हावी, अशी इच्छा आहे.”

पती रितेशसोबत स्पॉट

दीर्घकाळ दुबईत राहिल्यानंतर राखी सावंत मुंबईत परतली आहे. तिच्‌ म्हणणे आहे की, दीर्घकाळ ती आपल्या नोकरीसाठी राहते. ती तिथे टिकटॉकवर व्हिडिओ बनवते. तिच्या घटस्फोटाचे प्रकरण अद्याप मिटलेले नाही. पण, आता ती एक्स पती रितेशसोबत दिसलेय. ती मुंबईमध्ये स्पॉट झाली. शेवटी ती बिग बॉस मराठी’ मध्ये दिसली होती.

photo- Viral Bhayani instaवरून साभार

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

हेदेखील वाचा – 

Back to top button