श्रेयस तळपदेने केलं पंतप्रधानांचं कौतुक; ‘नरेंद्र मोदी पुन्हा निवडून येतील, असं राजकीय वातावरण’ | पुढारी

श्रेयस तळपदेने केलं पंतप्रधानांचं कौतुक; 'नरेंद्र मोदी पुन्हा निवडून येतील, असं राजकीय वातावरण'

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रेयस तळपदेचा आगामी चित्रपट कर्तम भुगतमची चर्चा होत असताना त्याने एका मुलाखतीत नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिलीय. निवडणुकीच्या वलयात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेऊन मनातील भावना व्यक्त केल्या. सध्या राजकीय परिस्थितीत मोदी निवडून येण्यासारखे वातावरण असल्याचे त्याने मुलाखतीत म्हटले आहे. विचारलेल्या प्रश्नावर श्रेयसने उत्तम उत्तर दिल्याने त्याची चर्चा होताना दिसतेय.

श्रेयस तळपदे काय म्हणाला?

श्रेयस तळपदेने मुलाखतीत सांगितले की, “सध्या देशातील राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा निवडून येतील, अशी चिन्हे आहेत. त्यांचं मला विशेष कौतुक आहे. गेली १० वर्ष मोदीजी देशात विकासकामे करत आहेत. ते आधी देशाचा विचार करतात. अटलबिहारी वाजपेयी सुद्धा असेच होते. जनतेचा कौल नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे. त्यामुळे सध्याचं वातावरण पाहता नरेंद्र मोदी पुन्हा निवडून येतील.”

कर्तम् भुगतम् या नव्या चित्रपटाची चर्चा का होतेय?

  • विजय राज आणि मधु यांच्याही प्रमुख भूमिका आहेत
  • विजय आणि श्रेयस या दोघांचा कसदार अभिनय चित्रपटात पाहायला मिळेल
  • श्रेयस तळपदेचा कर्तम भुगतम हा चित्रपट १७ मे रोजी रिलीज होणार आहे
  • चित्रपटाचे दिग्दर्शन सोहम शाह यांनी केले आहे
  • याआधी त्यांनी काल, लक या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे

प्रसिद्ध दिग्दर्शक सोहम शाह काय म्हणाले?

सोहम शाह यांनी सांगितले की, चित्रपटाची कथाखूप वर्ष आधीपासून विचारात होती, मी जेव्हा चित्रपट काल बनवला होता. तेव्हापासून माझी चित्रपटाची दृष्टी वेगळी होती. कोरोना काळात मी जेव्हा चित्रपट निर्मितीचे पद्धत आणि कथेबद्दल प्रेक्षकांची आवड पाहिलू आणि मी दृष्टीकोन बदलला. दिड- दोन वर्षांमध्ये मी पुन्हा स्क्रिप्ट लिहिली आणि फायनल ड्राफ्ट तयार केला. कर्तम भुगतम शीर्षक माझ्या मनी पहिल्या दिवसापासून होता. पण, या गोष्टीवरून निश्चित नव्हतो की, काय माहिती की या चित्रपटाबद्दल निर्माता आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय असतील?

मर्डर इन माहिममुळे विजय राज चर्चेत

अभिनेता विजय राज यांना वेगळ्या ओळखीची गरज नाही. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला आङे. काही विनोदात्मक अभिनयातही त्यांचा हातखंडा आहे. मर्डर इन माहिमुळे ते चर्चेत असून त्याच चित्रपटातील कलाकार, प्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा यांनी त्यांचे कौतुक केले आहे. विजय राज हे शानदार आणि कसदार अभिनय करणारे अभिनेते असा उल्लेख आशुतोष यांनी केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

हेदेखील वाचा –

Back to top button