Tabu : १२ वर्षांनंतर हॉलिवूडमध्ये तब्बू; ऑस्कर विजेत्या ‘या’ फ्रेंचाइजीमध्ये झळकणार

Tabu
Tabu
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर, कृती सेनॉन आणि अभिनेत्री तब्बू यांच्या 'क्रू' चित्रपटाच्या यशानंतर तब्बूच्या हाताला आता मोठा प्रोजक्ट लावला आहे. १२ वर्षानंतर तब्बू आता हॉलिवूड चित्रपटातून पुन्हा एकदा पडद्यावर झळकणार आहे.

  • क्रू' चित्रपटाच्या यशानंतर तब्बूचा नवा चित्रपट
  • तब्बू हॉलिवूडमध्ये काम करणार
  • ऑस्कर विजेत्या फ्रेंचाइजी 'ड्यून' मध्ये दिसणार 

मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेत्री तब्बू पुन्हा एकदा हॉलिवूड प्रोजेक्ट करण्यास सज्ज झाली आहे. ऑस्कर विजेत्या फिल्म फ्रँचायझी 'ड्यून' या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये ती दिसणार आहे. या चित्रपटाची कथा आधी दाखवलेल्या घटनांपूर्वीची असणार आहे. ही एक वेबसीरीज असून तब्बूला यासाठी निर्मात्यांनी कास्ट केल्याची माहिती समोर आली आहे. याआधी तब्बूने हॉलिवूडमध्ये 'द नेमसेक' आणि 'लाइफ ऑफ पाई' या दोन प्रोजेक्टमध्ये काम केले आहे. या वेबसीरीजमध्ये तब्बू 'सिस्टर फ्रान्सिस्का' ची भूमिका साकारणार आहे. तब्बू पुन्हा दिसणार असल्याने चाहत्यांची आनंद द्विगुणीत झाला आहे.

तब्बू याआधीही ऑस्कर विजेत्या प्रोजेक्ट्सचा एक भाग होती

तब्बूचा शेवटचा हॉलिवूड चित्रपट 'लाइफ ऑफ पाई' २०१२ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात तब्बूसोबत बॉलिवूड अभिनेता इरफान खान, आदिल हुसैन आणि सूरज शर्मा यांनीही काम केले आहे. ४ वेळा ऑस्कर पुरस्कार पटकावलेला हा चित्रपट चाहत्याच्या पसंतीस उतरला होता. यानंतर आता १२ वर्षानंतर तब्बू पुन्हा या बेवसारीजमधून पडद्यावर येत आहे.

तब्बूचा आगामी प्रोजक्ट 

वक्रफंन्टबद्दल बोलायचे झाले तर लॉकडाऊननंतर तब्बूने 'भूल भुलैया २', 'दृश्यम २', 'भोला' आणि 'क्रू'मध्ये काम केले आहे. यातील काही चित्रपट हिट झाले. आता तब्बू लवकरच अजय देवगणसोबत 'औरों में कहाँ दम था' या चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news