बिग बॉस मराठी : आज सुबोध भावे-पूजा सावंत यांची एन्ट्री होणार

सुबोध भावे-पूजा सावंतची एन्ट्री बिग बॉस मराठी घरात होणार
सुबोध भावे-पूजा सावंतची एन्ट्री बिग बॉस मराठी घरात होणार

पुढारी ऑनलाईन

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सुबोध भावे आणि पूजा सावंत तर जाणार आहेतच पण अजून दोन सदस्य देखील जाणार आहेत. ज्यांच्यासाठी बिग बॉस मराठीचे घर विशेष आहे… ते आहेत बिग बॉस मराठीच्या मागील दोन पर्वातील सदस्य म्हणजेच माधव देवचक्के आणि सुशांत शेलार. आता घरात जाणार म्हणजे टास्क घेऊनच जाणार. या दोघांनी देखील सदस्यांना टास्क दिले. सुबोध भावे-पूजा सावंत यांची एन्ट्री घरात झाल्यानंतर सदस्यांना कोणत्या नव्या आव्हानांना सामोरे जावे लागणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

घरातील सदस्यांना माधव आणि सुशांतने दिला तिरंदाजीचा टास्क. ज्यामध्ये एक सदस्य दुसर्‍या सदस्याच्या निशाण्यावर असणार आहे. विकासच्या निशाण्यावर मीनल तर सोनालीच्या निशाण्यावर विकास असणार आहे. बघूया घरामध्ये निशाणा साधणारे सदस्य हा टास्क कसा पार पाडणार ते?

सुशांत सदस्यांना म्हणाला, "तुम्ही एकमेकांना टार्गेट करण्यात किती एक्सपर्ट आहात हे मी काही सांगण्याची गरज नाहीये." या टास्कमध्ये हेडशॉट असणार आहे.

१०० पॉइंटचा, दोन्ही हातांवर ५० – ५० दोन्ही पायांवर २० – २०. बघूया कोणता सदस्य अधिक पॉइंट मिळवून हा टास्क जिंकणार ते आजच्या भागामध्ये.

तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news