The Sabarmati Report : राशी खन्ना-विक्रांत मेस्सीचा ‘द साबरमती रिपोर्ट’ ची नवी तारीख जाहीर | पुढारी

The Sabarmati Report : राशी खन्ना-विक्रांत मेस्सीचा 'द साबरमती रिपोर्ट' ची नवी तारीख जाहीर

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता विक्रांत मेस्सी आणि राशी खन्ना अभिनीत बहुप्रतिक्षित चित्रपट ‘द साबरमती रिपोर्ट’ ( The Sabarmati Report ) आता नव्या दिवशी रिलीज होणार आहे. याआधी ३ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणारा होता. मात्र, आता २ ऑगस्टला थिएटरमध्ये चाहत्याच्या भेटीस येणार आहे. राशीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, ” २ ऑगस्ट रोजी ” द साबरमती रिपोर्ट ” च्या फाइल्स पुन्हा उघडणार”

संबंधित बातम्या 

रंजन चंदेल दिग्दर्शित ‘द साबरमती रिपोर्ट’ ( The Sabarmati Report ) हा एक विचार करायला लावणारा सिनेमॅटिक अनुभव असणार आहे. २७ फेब्रुवारी २००२ रोजी राज्यातील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या घटनांची कथा मांडतो.

विक्रांत मेस्सी आणि राशी खन्ना, दोघेही त्यांच्या आकर्षक कामगिरीसाठी आणि अष्टपैलुत्वासाठी ओळखले जाणारे प्रतिभावंत अभिनेते हा चित्रपट दाखवण्यासाठी सज्ज होत आहेत. नवीन रिलीजची तारीख लॉक इन केल्यामुळे चाहते आता विक्रांत मॅसी आणि राशी खन्ना यांच्या ‘द साबरमती रिपोर्ट’ साठी उत्सुक आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raashii Khanna (@raashiikhanna)

Back to top button