Marathi Movie : संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली

संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील चित्रपट
संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील चित्रपट
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' हा चित्रपट २६ एप्रिल २०२४ ला महाराष्ट्रात प्रदर्शित होणार होता. पण आता हा चित्रपट सेन्सॉर बोर्ड प्रदर्शनासाठी काही वेळेसाठी थांबवला आहे, असं चित्रपटाचे लेखक, निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी सांगितले आहे.

सध्या देशात चाललेली आचारसंहिता, मतदान या गोष्टीमुळे निवडणूक आयोगाने सेन्सॉर बोर्डला दिलेले नियम पाहून हा चित्रपट आचारसंहितेमध्ये प्रदर्शित करता येणार नाही, असे कारण पुढे आले आहे. चित्रपटाच्या टीमने अतिशय कष्ट करून सर्वांनी दिवसरात्र काम करून हा चित्रपट बनवला आहे , आता ऐन प्रदर्शनाच्या तोंडावर आमचा चित्रपट थांबवला ह्याच दुःख होत आहे. पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टित सुपरहिट चित्रपट होणार, असे मनोज जरांगे-पाटील यांची मध्यवर्ती भूमिका करणारे अभिनेते रोहन पाटील यांनी सांगितले आहे.

हा चित्रपट आता येत्या २१ जून २०२४ ला प्रदर्शित होईल असं दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी सांगितले आहे. "संघर्षयोद्धा" चित्रपट प्रदर्शनासाठीची तारीख पुढे गेल्यानंतर चित्रपटाचे लेखक, निर्माते गोवर्धन दोलताडे, दिग्दर्शक शिवाजी दोलताडे, मनोज जरांगे-पाटील यांची भूमिका करणारे अभिनेते रोहन पाटील आणि सर्व टीमने अंतरवाली सराटी येथे ताबडतोब मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन सर्व गोष्टी सांगितल्या.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, मी लवकरच माझ्या वेळेनुसार पत्रकार परिषद घेऊन देखील चित्रपटाविषयी बोलेन.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news