‘नवरी मिळे हिटलरला’ साखरपुडा विशेष भाग : एजे आणि लीलाचा साखरपुडा; दोघांचं लग्न होणार का? | पुढारी

'नवरी मिळे हिटलरला' साखरपुडा विशेष भाग : एजे आणि लीलाचा साखरपुडा; दोघांचं लग्न होणार का?

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत एजे आणि लीला ही इम्परफेक्ट जोडी एकत्र येत आहे. हो हे खरं आहे. कारण एजे आणि लीलाचा साखरपुडा होत आहे.

या साखरपुड्या मागची गोष्ट अशी आहे की, लीलाला खात्री होती की रेवतीला विक्रांतच्या तावडीतून सोडवण्यासाठी एजेच मदत करू शकतात. लीला एजेच्या घरी जाऊन त्याची मदत मागते. एजे मदत करण्याची तयारी दर्शवतो, परंतु त्या बदल्यात तिच्याकडून वचन मागतो. एजे विक्रांतला त्याच्या चुकीच्या वागणुकीबद्दल शिक्षा देतो आणि रेवतीची माफी मागण्यासाठी प्रवृत्त करतो.

दरम्यान, एजे एक पार्टी ठेवतो ज्यात तो लीलाशी लग्न करण्याचा त्याचा निर्णय जाहीर करतो. एजेच्या या वक्तव्याने तिन्हीही सुना- दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या लीला ही त्यांची सासू असणार आहे,

या विचाराने निराश होतात. लवकरच अभिराम जहागीरदार आणि लीलाचा साखरपुडा संपन्न होणार आहे. पण ह्या दोघांचं लग्न होईल? हे पाहणे खूप रंजक असेल. एजेच्या सुना ह्या लग्नामध्ये काही अडथळे आणतील का? हे पाहणे खूप रंजक असणार आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ साखरपुडा विशेष भाग २२ ते २३ एप्रिल रात्री १० वा झी मराठीवर पाहता येईल.

Back to top button