Thalaivar 171 : ‘थलायवर १७१’ मध्ये रजनीकांत सोबत दिसणार श्रुती हसन?; ‘या’ स्टार्सचीही एन्ट्री | पुढारी

Thalaivar 171 : 'थलायवर १७१’ मध्ये रजनीकांत सोबत दिसणार श्रुती हसन?; 'या' स्टार्सचीही एन्ट्री

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक आणि निर्माता लोकेश कनागराज सध्या साऊथचा सुपरस्टार रजनीकांतसोबत त्याच्या आगामी चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटाचे तात्पुरते शीर्षक ‘थलायवर १७१’ ( Thalaivar 171 ) असे आहे. गेल्या वर्षी निर्मात्यांनी या चित्रपटाची घोषणा केली होती. आता लवकरच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. याचदरम्यान, आता या चित्रपटातील नवीन कलाकारांची एन्ट्री होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे रजनीकांत पडद्यावर एक नव्या अभिनेत्री दिसणार असल्याने चाहत्यांना आनंद द्विगुणीत झाला आहे.

संबंधित बातम्या 

नुकतेच मिळालेल्या माहितीनुसार, सुपरस्टार रजनीकांत याच्या आगामी ‘थलायवर १७१’ ( Thalaivar 171 ) या चित्रपटात अभिनेता कमल हसन यांची मुलगी अभिनेत्री श्रुती हसन आणि तेलुगु अभिनेता सत्यराज हे दोघेजण दिसणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अद्याप या वृताला कोणीच अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. जर हे वृत्त खरे असेल तर रजनीकांत श्रुती हसन सोबत पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. तर श्रुती आणि रजनीकांत पहिल्यांदाच एकत्रित स्क्रीन शेअर करणार आहेत. ‘थलायवर १७१’ या चित्रपटाचा अधिकृत प्रोमो येत्या २२ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.

यापूर्वी श्रुती हसन आणि लोकेश कनागराज यांनी एका ‘इनिमेल’ नावाचा एक संगीत व्हिडिओत एकत्रित काम केले होतं. या व्हिडिओत लोकेश कनागराज हे मुख्य भूमिकेत होते. यानंतर श्रुतीला या चित्रपटाची कास्ट करण्यात आलं आहे. यापूर्वी ‘थलायवर १७१’ चित्रपटातील रजनीकांतचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये रजनीकांत एका वेगळ्याच अवतारात दिसले आहेत. हा चित्रपट एका ड्रग्स केसच्या भोवती फिरणार आहे.

 

Back to top button