सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोघांना १० दिवसांची पोलीस कोठडी

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोघांना १० दिवसांची पोलीस कोठडी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी विकी गुप्ता आणि सागर पाल या दोन संशयित आरोपींना पोलिसांनी गुजरातच्या भुज येथून अटक केली होती. न्यायालयाने त्यांना मंगळवारी १० दिवसांची म्हणजेच २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.

वांद्रे पश्चिममधील सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना शोधण्यात या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाला सोमवारी रात्री उशिरा यश मिळाले. गुजरातमधील भुज येथून दोघांना अटक केली. मंगळवारी दोन्ही आरोपींना घेऊन मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस मुंबईत दाखल झाले. मुंबईत त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

लॉरेन्स गँगमधील अनमोल बिश्नोई, गोल्डी ब्रार व रोहित गोदराने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. सागर पालने सलमानच्या घरावर गोळी चालवल्याची कबुली दिली आहे. सागर हा हरियाणात काम करत असताना बिश्नोई गँगच्या संपर्कात आल्याची माहीती मिळत आहे. गोळीबारासाठी वापरलेली मोटारसायकल त्यांनी रायगडमधून खरेदी केली होती.


हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news