Shah Rukh Khan : शाहरुख खानला ट्रोब युनिव्हर्सिटीची पीएचडी | पुढारी

Shah Rukh Khan : शाहरुख खानला ट्रोब युनिव्हर्सिटीची पीएचडी

मुंबई ः दुसरी प्रतिष्ठित शाहरुख खानला ( Shah Rukh Khan ) ट्रोब युनिव्हर्सिटी पीएचडी स्कॉलरशिप, नवी दिल्ली येथील विद्यार्थिनी सुमैरा हिला देण्यात आली. या विद्यार्थिनीला असुरक्षित समुदायातील लोकांना उत्तम आरोग्य सेवा देण्याची उत्कट इच्छा आहे, ते पूर्ण करण्यासाठी ती ऑस्ट्रेलियामध्ये उच्च शिक्षण घेणार आहे. दिल्ली येथे आयोजित एका गाला डिनरमध्ये, प्रोफेसर थिओ फॅरेल, ला ट्रोब युनिव्हर्सिटीचे कुलगुरू, यांनी सुमैरा खानला शाहरुख खान ला ट्रोब युनिव्हर्सिटी पीएचडी स्कॉलरशिप – 2024 प्रदान केली, ज्या अंतर्गत सुमैराला 225,000 एयूडी डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम दिली जाईल.

संबंधित बातम्या 

चार वर्षांच्या स्कॉलरशिपसाठी स्पर्धा करणार्‍या संपूर्ण भारतातील अर्जदारांमधून सुमैराची निवड करण्यात आली. ही स्कॉलरशिप शाहरुख खान ( Shah Rukh Khan ) एसआरकेच्या मानवता आणि सामाजिक समानतेतील कामगिरीला मान्यता देते. ही पीएचडी स्कॉलरशिप मेलबर्नच्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलसोबत ला ट्रोबच्या दीर्घकाळ चाललेल्या भागीदारीमुळे शक्य झाली आहे. ही स्कॉलरशिप जगभरात बदल घडवू इच्छिणार्‍या महत्त्वाकांक्षी महिला भारतीय संशोधकांना मदत करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या स्कॉलरशिपमुळे सुमैराला मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथील ला ट्रोबच्या अत्याधुनिक संस्थांमध्ये संशोधन करता येणार आहे.

सुमैरा वैद्यकीय मानवशास्त्रज्ञ डॉ. टेरीन फिलिप्स आणि डॉ. कॅथरीन ट्रंडल यांच्यासोबत काम करणार आहे. शाहरुख खान म्हणाला, सुमैराची असुरक्षित समुदायांना उत्तम आरोग्यसेवा पुरवण्याची आवड प्रेरणादायी आहे. विज्ञानाच्या माध्यमातून जीवन सुधारू इच्छिणार्‍या इतर भारतीय महिलाही सुमैराच्या प्रवासातून शिकू शकतात.

Back to top button