जान्हवी कपूर-रामचरण
जान्हवी कपूर-रामचरण

RC 16 : जान्हवी कपूर रामचरणसोबत स्पॉट, ऑर्गेंजा साडीतील फोटो व्हायरल (Video)

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जान्हवी कपूर दुसरा तेलुगु चित्रपट RC 16 साठी तयारी करत आहे. तिचे राम चरणसोबत फोटो व्हायरल झाले असून जान्हवी ऑर्गेंजा साडीमध्ये दिसत आहे, सध्या या चित्रपटाला 'RC 16' असे नाव देण्यात आले आहे. बुधवारी जान्हवी चित्रपटाच्या लॉन्च इव्हेंटमध्ये पोहोचली. (RC 16) यावेळी राम चरण आणि जान्हवी स्पॉट झाले. काही व्हिडिओज आणि फोटोजदेखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. एका फोटोमध्ये राम चरण-जान्हवी हसताना ए आर रहमान यांच्यासोबतदेखील पोज देताना दिसत आहे.

CL Solanki @solanki_cl, BINDU, Gautham x अकाऊंटवरून साभार

२० मार्चला पूजा समारंभात चित्रपटातील कलाकार आणि क्रू मेंबर्स सहभागी झाले होते. या दरम्यान, जान्हवी ग्रीन कलरच्या साडीत खूप सुंदर दिसत होती. तर राम चरण व्हाईट शर्टमध्ये खूप हँडसम दिसत होता. आगामी चित्रपट RC 16 चे दिग्दर्शन बुच्ची बाबू सना करत आहेत. वृद्धि सिनेमाज आणि सुकुमार यांची कथा असून ए आर रहमान संगीत देणार आहेत. जान्हवी कपूरच्या २७ व्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी चित्रपटाची घोषणा केली होती.

यावेळी जान्हवी कपूरचे वडील बोनी कपूर देखील दिसले. याआधीही दोघे त्यांना हैदराबाद विमानतळावर स्पॉट करण्यात आले होते. दरम्यान, राम चरण निर्माता शंकर यांचा आगामी ॲक्शनपट 'गेम चेंजर'ची प्रीमियर तयारी करत आहे. यामध्ये कियारा अडवाणी दिसणार आहे. तर जान्हवी ज्युनियर एनटीआर आणि सैफ अली खान सोबत 'देवरा' या तेलुगु चित्रपटाधून डेब्यू करणार आहे. तिच्याकडे 'उलझ' आणि 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' हे देखील चित्रपट आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news