Fateh Movie : फतेहचे पहिले पोस्टर प्रदर्शित, सोनू सूद करणार दिग्दर्शन | पुढारी

Fateh Movie : फतेहचे पहिले पोस्टर प्रदर्शित, सोनू सूद करणार दिग्दर्शन

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सोनू सूदने त्याच्या आगामी ‘फतेह’ चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. दमदार ॲक्शन फिल्ममध्ये जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सोनू सूद या चित्रपटद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. (Fateh Movie)
फतेहचे पोस्टर नक्कीच खास आहे कारण प्रेक्षकांना काहीतरी नवीन आणि उत्तम गोष्ट बघायला मिळणार यात शंका नाही. सोनू या चित्रपटात काहीतरी वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे असं देखील कळतंय. सायबर क्राइम थ्रिलर असलेल्या चित्रपटाचे लेखन आणि निर्मितीही सोनू ने केली आहे. (Fateh Movie)

शक्ती सागर प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओज निर्मित हा चित्रपट सायबर क्राईमच्या गुंतागुंत आणि आव्हानांभोवती दिसणार आहे. या चित्रपटात काही चित्तथरारक ॲक्शन सीक्वेन्स देखील असून जे हॉलीवूड स्टंट तज्ञ ली व्हिटेकर यांच्या देखरेखीखाली पार पडले आहेत. ‘ फतेह’ भारत, यूएसए, रशिया आणि पोलंडसह जगभरातील ठिकाणी शूट झाला असून प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अफलातून गोष्ट बघायला मिळणार आहे.

या चित्रपटाबद्दल बोलताना सोनू सूदने म्हणाला, ‘फतेह’ ची कथा अशी आहे ज्याने माझी उत्सुकता वाढवली आणि म्हणून मी हा चित्रपट तयार केला आहे. चित्रपटाचा विषय या महत्त्वपूर्ण असून अश्या विषयाकडे प्रेक्षकांनी वेगळ्या नजरेतून बघावं अस मला वाटत” फतेह या वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Back to top button