standup comedian munawar faruqui : २ महिन्यांत १२ शो रद्द झाल्यानंतर, स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी म्हणाला, "मेरा काम हो गया, अलविदा" | पुढारी

standup comedian munawar faruqui : २ महिन्यांत १२ शो रद्द झाल्यानंतर, स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी म्हणाला, "मेरा काम हो गया, अलविदा"

बंगळुरु : पुढारी ऑनलाईन : standup comedian munawar faruqui : काही लोकांच्या धमक्यांमुळे मागच्या दोन महिन्यांत किमान १२ शो रद्द झाल्यानंतर कॉमेडियन मुनवर फारुकीने इन्सटाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे.  “मी आणखी शो करू शकत नाही. आजही बंगळुरूमधील एक नियोजित शो बंगळुरू पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर रद्द करण्यात आला. कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्येचे कारण देत पोलिसांनी शोच्या आयोजकांना शो रद्द करण्यास सांगितले”, अशा आशयाची पोस्ट फारुकीने केली आहे. इतकेच नाही तर पोलिसांनी आयोजकांना लिहिलेल्या पत्रात फारुकीला ‘विवादित व्यक्ती’ म्हटले आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला, फारुकीला मध्य प्रदेशातील एका कार्यक्रमात धार्मिक भावना दुखावतील अशी  टिप्पणी केल्याबद्दल सुमारे एक महिन्यासाठी तुरुंगात टाकण्यात आले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

standup comedian munawar faruqui : नफ़रत जीत गई, कलाकार हार गया

बंगळूरू येथील कार्यक्रम रद्द झाल्यानंतर आज (दि.२८) इंस्टाग्राम पोस्टमध्ये मुनव्वर फारुकी म्हणाला, , “नफ़रत जीत गई, कलाकार हार गया. मेरा काम हो गया, अलविदा.. अन्याय.” मात्र, त्याच्या काही चाहत्यांनी त्याला शो बंद न करण्याची विनंती केली. संगीतकार मयूर जुमानी यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. “आम्ही तुला असे करू देणार नाही”, असे त्‍यांनी म्‍हटलं आहे. आयोजकांना लिहिलेल्या पत्रात, गुड शेफर्ड ऑडिटोरियम, बंगळुरू पोलिसांनी फारुकीच्या “डोंगरी टू नोव्हेअर” या शोचा संदर्भ दिला आणि तो एक “वादग्रस्त व्यक्ती” असल्याचे सांगितले. बंगळुरू येथील हिंदू जागरण समितीचे मोहन गौडा यांनीही हा शो होऊ देणार नसल्याचे म्‍हटलं आहे.

६०० तिकीटे विकूनही धमक्यांमुळे कार्यक्रम रद्द

इंस्टाग्राम पोस्टमध्ये फारुकीने म्‍हटलं आहे की, बंगळुरू कार्यक्रमासाठी जवळजवळ ६०० पेक्षा जास्त तिकिटे विकली आहेत. परंतू तोडफोड करण्याच्या धमक्यांमुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी माझ्या टीमने दिवंगत पुनीत राजकुमार सरांच्या संस्थेला चॅरिटीसाठी कॉल केला होता, जो आम्ही या शोमध्ये दाखवणार होतो. पुनीत राजकुमार यांच्या संस्थेने सुचविलेल्या धर्मादाय नावाने शोची तिकिटे न विकण्याचे आम्ही मान्य केले होते.

मला विनोदासाठी तुरुंगवास भोगावा लागलाे; पण मी माझा शो कधीच रद्द केला नाही. त्यात कोणतीही अडचण आली नाही. हे अन्यायकारक आहे. हा शो भारतात धर्माच्या पलीकडे जात असल्याचेही दाखवण्यात आले आहे. त्यासाठी लोकांनी माझ्यावर प्रेम दाखवले आहे.आमच्याकडे या शोचे सेन्सॉर प्रमाणपत्रही आहे आणि शोमध्ये स्पष्टपणे कोणतीही अडचण नव्हती.आम्ही स्थळ आणि प्रेक्षकांच्या धमक्यांमुळे गेल्या दोन महिन्यांत १२ शो रद्द केले आहेत, असेही त्‍याने नमूद केलं आहे.

माझा अंत पाहिला

मला वाटते की माझा अंत पाहिला आहे. माझे नाव मुनव्वर फारुकी आहे आणि ही माझी वेळ आहे. तुम्ही लोक अप्रतिम प्रेक्षक आहात. अलविदा, माझे काम पूर्ण झाले. अशा आशयाची पोस्ट केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला फारुकी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, मी केलेल्या शोमध्येकाहीही चुकीचे नाही. माझ्या एका शोमधून ड्रायव्हर, स्वयंसेवक आणि रक्षकांसह ८० लोक एका उदरनिर्वाह करतात.कधी कधी मला वाटायचे की कदाचित मी चुकीचा आहे, पण जे घडले त्यानंतर मला समजले की काही लोक याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावाही त्‍याने केला आहे.

हेही वाचलं का?

Back to top button