Miss World 2024 | मिस वर्ल्डचा मुकूट भारतात येणार? मुंबईत आज ग्रँड फिनाले; 28 वर्षांनंतर देशात आयोजन | पुढारी

Miss World 2024 | मिस वर्ल्डचा मुकूट भारतात येणार? मुंबईत आज ग्रँड फिनाले; 28 वर्षांनंतर देशात आयोजन

पुढारी ऑनलाईन डेस्क : सौंदर्य स्पर्धातील जगातील सर्वांत महत्त्वाची स्पर्धा मिस वर्ल्डची अंतिम फेरी आज (शनिवार) रात्री मुंबईत होणार आहे. जीओ वर्ल्ड कन्वेंन्शन सेंटरमध्ये होत असलेल्या या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व सिनी शेट्टी करत आहे.

ही ७१वी मिस वर्ल्ड स्पर्धा आहे. स्पर्धेची अंतिम फेरी यापूर्वी सौदी अरेबियात होणार होती. पण नंतर ती मुंबईत घेण्याचे नियोजित झाले. या स्पर्धेचे सूत्रसंचान करण जोहर आणि २०१३ची मिसवर्ल्ड मेगन युंग करणार आहेत. २००६च्या मिस वर्ल्ड स्पर्धेत करण जोहर परिक्षकांच्या भूमिकेत होता.

लाईव्ह स्ट्रिमिंग कोठे होईल?

मिस वर्ल्ड स्पर्धेची अंतिम सोनी लिववर रात्री ७.३०पासून पाहाता येईल. शिवाय www.missworld.com या वेबसाईटवर ही लाईव्ह स्ट्रिम उपलब्ध असेल. जगभरातील १ अब्ज लोक लाईव्ह स्ट्रिमच्या माध्यमातून हा कार्यक्रम पाहातील.

यापूर्वीच्या भारतीय विजेत्या

ऐश्वर्या रॉय, प्रियंका चोप्रा आणि मानुषी छिल्लर या तिघींनी आतापर्यंत मिस वर्ल्डचा मुकूट मिळवला आहे. ही स्पर्धा १९५१पासून घेतली जाते.

हेही वाचा

Back to top button