vanita kharat
vanita kharat

‘सुंदरी’ मालिकेतून अनू आणि साहेबची एक्झिट; वनिता खरात घेणार प्रेक्षकांचा निरोप

पुढारी ऑनलाईन डेस्क : आई आणि मुलीचं नातं हे जगावेगळं असतं. आईसोबत रक्ताचंच नातं असलं की त्यांच्या भावना ख-या असतात किंवा तेव्हाचं ते नातं टिकतं असं नसून आई या नात्याने आपुलकीने सांभाळ करणारी एखादी स्त्री पण खऱ्या आई इतकाच जीव बाळाला लावू शकते हा विचार 'सुंदरी' या मालिकेतून मांडला गेला आहे. सावी ही जरी अनू आणि आदित्यची मुलगी असली तरी सुंदरीने सावीला आईचं प्रेम, आईची माया दिली आहे. त्यामुळे सुंदरी आणि सावी मधलं आई मुलीचं नातं हे दिवसेंदिवस फुलत चाललेलं प्रेक्षकांनी अनुभवलं आहे.

आता 'सुंदरी' ही मालिका पुन्हा एकदा नव्या वळणावर पोहचणार आहे. काही महिन्यांपूर्वी 'साहेब' या खलनायिकेची एंट्री मालिकेत झाली होती जी भूमिका अभिनेत्री वनिता खरात साकारत होती. आता साहेब हे पात्रं प्रेक्षकांचा निरोप घेणार असून मालिकेत रोमांचक असे सीन्स पाहायला मिळणार आहेत.

'सुंदरी' सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता सन मराठीवर पाहता येईल.

logo
Pudhari News
pudhari.news