Kumar Shahani : माया दर्पण फेम दिग्दर्शक कुमार साहनी यांचे निधन | पुढारी

Kumar Shahani : माया दर्पण फेम दिग्दर्शक कुमार साहनी यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘माया दर्पण’, ‘तरंग’, ‘ख्याल गाथा’, ‘कसबा’ फेम आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक कुमार साहनी ( Kumar Shahani ) यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे सिने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

संबंधित बातम्या 

कुमार साहनी यांनी पुणे येथील फिल्म इन्स्टिट्यूटमधून पदवी संपादन केली. यानंतर ते फ्रान्सला गेला. रॉबर्ट ब्रेसनला त्याच्या ‘Une femme douce’ या चित्रपटासाठीही त्यांनी मदत केली. यानंतर निर्मल वर्मा यांच्या कथेवर आधारित त्याच्या ‘माया दर्पण’ या चित्रपटाला हिंदीतील सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.‘तरंग’, ‘ख्याल गाथा’, ‘कसबा’ आणि ‘चार अध्याय’ यांसारख्या अनेक चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे.

दिग्दर्शकासोबत त्यांनी लेखक आणि शिक्षक म्हणूनही आपला ठसा उमटविलाय. १९८९ मध्ये त्यांनी ‘ख्याल गाथा’ आणि १९९१ मध्ये ‘भावनाथरणा’ची निर्मिती केली. तर १९९७ मध्ये त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘चार अध्याय’ या कादंबरीवर आधारित चित्रपटाची निर्मिती केली. कुमार साहनी यांचा जन्म ७ डिसेंबर १९४० रोजी लारकाना येथे झाला होता.

Back to top button