‘फतवा’ फेम प्रतिक गौतम-श्रद्धा भगतचं ‘चोरू चोरून’ गाणं पाहिलं का?

प्रतिक गौतम-श्रद्धा भगत
प्रतिक गौतम-श्रद्धा भगत
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : व्हेलेंटाईन डेला 'फतवा' सिनेमातील अभिनेता प्रतिक गौतम आणि अभिनेत्री श्रद्धा भगत यांचं चोरू चोरून (तिच्या मनाचं गुज) हे फिमेल वर्जन गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे. "दबक्या पावलांनी आली, माझी मालकीण झाली. एका वाघाची शिकार एका हरणीने केली" या गाण्याच्या लक्षवेधी शब्दांमुळे सोशल मीडियावर हे गाणं तुफान व्हायरल झालं होत. लाखो करोडो चाहत्यांनी यावर व्हिडिओ स्वरूपात रील्स बनवल्या होत्या. रसिक प्रेक्षकांनी हे गाणं अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. त्याचं गाण्याचं फिमेल वर्जन गायिका आर्या आंबेकर हिच्या सुमधूर आवाजात आपल्या भेटीला आलं आहे.

संबंधित बातम्या –

या गाण्याचे संगीत दिग्दर्शन संजीव – दर्शन यांनी केले आहेत. आकर्षक गीतरचना डॉ. विनायक पवार यांनी लिहिली आहे. या गाण्यात अभिनेता प्रतिक गौतम आणि अभिनेत्री श्रद्धा भगत हे कलाकार आहेत.

अभिनेता प्रतिक गौतम म्हणतो, "फतवा चित्रपटातून मी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं तसंच मी त्यात मुख्य नायकही होतो. विशेष म्हणजे चोरू चोरून गाण्यातील एका वाघाची शिकार एका हरणीने केली या शब्दामुळे हे गाणं संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं. भारतातचं नाही तर अगदी जागतिक स्तरावर मला या गाण्यासाठी उत्तम प्रतिसाद मिळाला. परदेशातून रील्स, मीम्स, कमेंट्सचा जणू पाऊस पडत होता. मला दररोज मेसेज यायचे की याचं फिमेल वर्जन आलं पाहिजे. तर मी विचार केला. या गोष्टीचं उत्तर द्यायला हवं. की वाघाची शिकार एका हरणीने केली तर आता पुढे कायं ? त्यामुळे मी ठरवलं की आपण याचं एक फिमेल वर्जन करूया. कारण जर हे गाणं इतकं हवहवंस वाटत आहे तर माझी ही जबाबदारी आहे की हे गाणं नायिकेच्या बाजूने देखील मांडलं पाहिजे."

"या गाण्याची खासियत म्हणजे, या गाण्यात आधीच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील. आणि दुसरं म्हणजे हे गाणं आर्याने गायलं आहे. अतिशय सुंदर बनलं आहे हे गाणं. आर्या आंबेकरने खूप गोड गायलं आहे. डॉ. विनायक पवार यांनी शब्दबद्ध सुद्धा सुरेख केलं आहे. संजीव – दर्शन यांचं संगीत आहे. सर्व कानसेन रसिक प्रेक्षकांना हे गाणं अगदी भावेल याची मला खात्री आहे. तसंच मी भविष्यात उत्तमोत्तम चित्रपट आणि नवी गाणी आणण्याचा प्रयत्न करेन."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news