Prathmesh Parab Engagement : दगडूला प्राजू भेटली! कोण आहे प्रथमेशची होणारी बायको?

Prathmesh Parab-Kshitija Ghosalkar
Prathmesh Parab-Kshitija Ghosalkar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टाईमपास फेम अभिनेता प्रथमेश परबने त्याची दीर्घकाळ मैत्रीण क्षितिजा घोसाळकरशी साखरपुडा केला. प्रथमेशच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साखरपुड्याचे फोटो पाहायला मिळत आहेत. (Prathmesh Parab ) प्रथमेशच्या 'टाईमपास- ३' या चित्रपटाच्या शूटिंगवेळी तो क्षितिजीच्या प्रेमात पडला होता. विषेश म्हणजे, १४ फेब्रुवारी या व्हॅलेंटाईन डेला दोघांचा साखरपुडा झाला. (Prathmesh Parab )

संबंधित बातम्या –

क्षिताजाने miles_in_style या इन्स्टाग्राम अकाऊंटवरदेखील आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. क्षितिजाने फोटो शेअर करताना लिहिले आहे-Our kind of Valentine's day??? Here's to FOREVER??❤️. याआधी तिने एक कार्ड पोस्ट करत आफल्या लग्नाच्या तारखेची घोषणा केली होती. त्यामध्ये २४-२-२०२४ अशी तारीख लिहिली होती.

कोण आहे क्षितीजा?

क्षितिजा घोसाळकर मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असलेली कंटेंट रायटर आहे. ती एक फॅशन मॉडेल आहे. ती एक सोशल वर्करदेखील आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही माहिती मिळतेय.

१४ फेब्रुवारी, २०१९ ला टाईमपास ३ च्या शूटिंगवेळी प्रथमेशने क्षितीजाला प्रपोज केलं होतं आणि तिथून रिलेशनशीपला सुरुवात झाली.

प्रथमेशने अशी घडवली आईशी भेट

प्रथमेश परबने टाईमपास ३ च्या प्रीमियरवेळी घरामध्ये आईला सांगितलं की, अशी एक मुलगी आहे. माझ्या लग्नासाठी तुम्ही तिला पाहा. तिला मी प्रीमियरला बोलावलं आहे. आणि तुम्ही तिला भेटा. दीड-दोनवर्ष तू तिच्यासोबत रिलेशनशीपमध्ये आहेस आणि नला का नाही सांगितलं, असे म्हणत आईने प्रथमेशला फटकारलं.

प्रीमियरवेळी प्रथमेशने आई बाबा, भावाची ओळख करून दिली आणि तो निघून गेला तिथून. तिथे प्रथमेशचे दोन मित्रदेखील होते. ते दोघे सर्व परिस्थिती सांभाळत होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news