Arjun Kapoor : आता जो येईल तो सैतान…,’सिंघम ३’ मध्ये अर्जुन बनणार खलनायक; पहिला लूक समोर

Arjun Kapoor
Arjun Kapoor
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याच्या आगामी 'सिंघम ३' चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटाची क्रेझ 'सिंघम' च्या पहिल्या भागापासून चाहत्यांच्या आहेत. 'सिंघम ३' या चित्रपटाची निर्मात्यांनी घोषणा केल्यापासून चाहते त्याच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या धमाकेदार चित्रपटात अजयसोबत बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह, करीना कपूर खान, दीपिका पदुकोण आणि टायगर श्रॉफ यानीही चित्रपटात भारदस्त अभिनय साकारलाय. तर आता बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचा ( Arjun Kapoor ) नवा लूक समोर आला आहे. या चित्रपटात अर्जुन खलनायकाची भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळत आहे.

संबंधित बातम्या 

अभिनेता अर्जुन कपूरचा ( Arjun Kapoor )आगामी 'सिंघम ३' चित्रपटातील हटके लूक दिग्दर्शक रोहित शेट्टीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. रोहितने अर्जुनचे दोन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटोत अर्जुन कपूर हातात शस्त्र घेऊन आणि त्याच्या चेहऱ्यावर रक्ताचे डाग दिसत आहेत. याशिवाय तो हसतानाही दिसत आहे. दुसऱ्या फोटोत अर्जुन आणि रणवीर सिंह एकमेकांकडे टक लावून पाहत दिसत आहेत. हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना रोहित शेट्टीने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'माणूस चुका करतो आणि त्याची शिक्षाही त्याला मिळते… पण आता जो येतो तो सैतान! मी म्हणू शकतो- अर्जुन कपूरचा परिचय!'

रोहितसोबत अर्जुन कपूरनेही चित्रपटाची झलक शेअर करत लिहिलं आहे की, "सिंघम' चा खलनायक. हिट-मशीन रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा भाग होण्यासाठी मी सज्ज आहे. मी तुम्हाला वचन देतो की, तेथे विनाश होईल.' हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी भरभरून कौतुक करताना कॉमेन्टसचा पाऊस पाडलाय. ८५ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

रोहित शेट्टीचा आगामी 'सिंघम अगेन' हा चित्रपट खूपच रोमांचक आणि धमाकेदार असणार आहे. या चित्रपटात एक नव्हे तर सहा सुपरस्टार एकत्रित काम करताना दिसणार आहेत. अजय देवगण, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, अक्षय कुमार आणि करीना कपूर यासारखे अनेक कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news