Lockdown Lagna मध्ये काका-पुतण्याची धमाल; हार्दिक जोशी-सुनील अभ्यंकर एकत्र | पुढारी

Lockdown Lagna मध्ये काका-पुतण्याची धमाल; हार्दिक जोशी-सुनील अभ्यंकर एकत्र

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता हार्दिक जोशी आणि सुनील अभ्यंकर ‘लॉकडाऊन लग्न’ या चित्रपटात एकत्र आले आहेत. (Lockdown Lagna) या चित्रपटात ते काका पुतण्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. हार्दिक जोशी ‘काका मला वाचवा’ म्हणत आहे. तो असं का म्हणत आहे याचं उत्तर ८ मार्चला मिळणार आहे. (Lockdown Lagna)

संबंधित बातम्या –

अमोल कागणे प्रस्तुत “लॉकडाऊन लग्न” या चित्रपटाची निर्मिती लक्ष्मण कागणे, अमोल कागणे, सागर पाठक यांनी केली आहे. सुमित संघमित्र यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर अमोल गोळे यांनी चित्रपटाचं छायांकन केलं आहे.

हार्दिक जोशी आणि सुनील अभ्यंकर हे दोघंही कसलेले अभिनेते आहेत. काका-पुतण्याच्या भूमिकेत असलेल्या या दोघांनी या चित्रपटात धमाल उडवून दिली आहे. काका पुतण्यासाठी काय करतो? हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

Back to top button