Priyanka Chopra : घटस्फोटाची चर्चा सुरु असताना प्रियांका गुड न्यूज बद्दल म्हणाली… | पुढारी

Priyanka Chopra : घटस्फोटाची चर्चा सुरु असताना प्रियांका गुड न्यूज बद्दल म्हणाली...

पुढारी ऑनलाईन डेस्क

अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिने आपल्या नावापुढील जोनास नाव हटविल्यामुळे ती घटस्फोट तर घेत नाही ना, अशी चर्चा सुरु झाली होती. प्रियांका आणि निक जोनास वेगळे होत असल्याच्या वृत्तामुळे चाहत्यांना धक्का बसला होता. दरम्यान, दोघांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु असतानाच ‘जोनास ब्रदर्स फॅमिली रोस्ट’ (Jonas Brothers Family Roast) शो नेटफ्लिक्सवर टेलिकास्ट करण्यात आला. यात प्रियांका आणि निक यांच्यात सुरेख बाँडिंग पहायला मिळाले. तसेच यात ती पती निक (Nick Jonas) आणि त्याच्या दोन भावांना रोस्ट करताना दिसली. यामुळे दोघे घटस्फोट घेत असलेल्या चर्चांना पुर्णविराम मिळालाय. Jonas Brothers Family Roast शोचा व्हिडिओ प्रियांकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. या शो मध्ये निक आणि त्याचे दोन भाऊ उपस्थित होते.

यात प्रियांका चोप्रा जोनास ब्रदर्स यांना उद्देशून म्हणते की, आम्ही आमच्या कुटुंबात एकमेव कपल आहोत ज्यांना मुले नाहीत. पण मला आणि निकला जे अपेक्षित आहे ते जाहीर करण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. निक आणि माझ्यात १० वर्षाचे अंतर आहे. तरीही आम्ही लग्न केले. मी भारतातून आले आहे जिथली संस्कृती, संगीत आणि मनोरंजन क्षेत्र खूप समृद्ध आहे. ९० च्या दशकातील अनेक पॉप कल्चरची उदाहरणे आहेत पण ती त्यांना समजत नाहीत. मी त्यांना ती समजावून सांगते. आम्ही एकमेकांना खूप काही गोष्टी शिकवतो.

प्रियांकाचे बोलणे एेकून निक आणि त्याच्या भावांना हसू आवरत नसल्याचे व्हिडिओत दिसते. निकचा भाऊ केविन जोनास याला दोन मुली आहेत. तर त्याचा दुसरा भाऊ जो जोनास याला एक मुलगी आहे. यामुळे प्रियांका आणि निक कधी गुड न्यूज देणार याची प्रतीक्षा चाहत्यांना लागली आहे.

लग्नाला तीन वर्षे पूर्ण होण्याआधीच…

प्रियांकानं (Priyanka Chopra) जोनास (Jonas) आडनावासह तिचे चोप्रा (chopra) आडनावदेखील हटवलंय. तिने इन्स्टाग्रामवर केवळ प्रियांका (Priyanka) असे नाव ठेवलंय. प्रियांका आणि निकच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण होण्याच्या आधीच ते वेगळे होत असल्याचं वृत्त पसरले होते. प्रियांकानं जोनास नाव हटविल्यामुळे तिच्या चाहत्यांना वाटू लागले आहे की, दोघांच्या नात्यात दुरावा आला असून ते वेगळे होणार आहेत. याच दरम्यान, निक जोनासनं इन्स्टाग्रामवर आपल्या वर्कआउटचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात तो हार्ड वर्कआउट करताना दिसतोय. त्याच्या या व्हिडिओवर स्वतः प्रियांकानं कमेंट केली. ” तू जवळ असतानाच मला मृत्यू यावा…” Damn! I just died in your arms… 😍 🥵 ❤️ अशी कमेंट करत प्रियांकानं हार्ट इमोजी शेअर केली होती. तिच्या या कमेंटमुळे ती निक पासून वेगळे होऊ शकत नाही, असेच संकेत मिळत आहेत. अनेकांनी या कमेंटला लाइक्स केलंय.

हे ही वाचा :

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

Back to top button