Rohit Saraf : रोहित सराफने केली राजस्थानची सफर, फोटो व्हायरल | पुढारी

Rohit Saraf : रोहित सराफने केली राजस्थानची सफर, फोटो व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : नॅशनल क्रश रोहित सराफ हा कायम ट्रॅव्हल करताना दिसतो आणि अशातच त्याने नुकतीच राजस्थान ट्रीप केली आहे. (Rohit Saraf ) हा युथ आयकॉन सध्या राजस्थानमध्ये त्याच्या खूप आवडत्या ‘मिसमॅच्ड’ वेब सीरिजच्या तिस-या भागाचे चित्रीकरण करत आहे. सोशल मीडियावर त्याने राजस्थानचे खास फोटो शेयर केले आहेत. त्याने राजस्थानच्या सांस्कृतिक वातावरणात अनुभव घेतला. (Rohit Saraf )

संबंधित बातम्या –

रोहित सुरेश सराफने टीव्ही आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. डियर जिंदगी (२०१६) मध्ये सहाय्यक भूमिका करून त्याने चित्रपटाची सुरुवात केली होती.

त्याने नॉर्वेजियन फिल्म व्हॉट विल पीपल (२०१७), कॉमेडी-ड्रामा हिचकी (२०१८), बायोपिक द स्काय इज पिंक (२०१९), डार्क कॉमेडी लूडो (२०२०), आणि थ्रिलर विक्रम वेधा (२०२२)मध्ये काम केलं आहे. रोहितने नेटफ्लिक्स रोमँटिक कॉमेडी मिसमॅच्डमध्येही अभिनय केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Suresh Saraf (@rohitsaraf)

Back to top button