‘सौ. प्रताप मानसी सुपेकर’च्या सेटवर रेखा बडेंच्या हातचे चविष्ट पदार्थ | पुढारी

'सौ. प्रताप मानसी सुपेकर'च्या सेटवर रेखा बडेंच्या हातचे चविष्ट पदार्थ

पुढारी ऑनलाईन डेस्क : शेमारू मराठीबाणाच्या ‘सौ. प्रताप मानसी सुपेकर’ या मालिकेमधील भामिनी या भूमिकेसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री रेखा बडे. पडद्यावर प्रतापच्या काकीची भूमिका कुशलतेने साकारत आहे, जी भूमिका त्यांचासाठी आईसारखीच आहे. तिची ऑन-स्क्रीन नकारात्मक भूमिका, भामिनी, रेखाच्या उलट आहे, तिच्या प्रेमळ आणि मैत्रीपूर्ण स्वभावासाठी तिचे ऑफ-स्क्रीन कौतुक केले जाते. तन्वीला रेखाचा दयाळूपणा फार आवडतो, जी बर्‍याचदा सगळ्यांसाठी स्वादिष्ट पदार्थ आणते आणि सर्वांना आपल्या हातचे चविष्ट पदार्थ खाऊ घालते.

संबंधित बातम्या –

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, मालिकेमध्ये मानसीची भूमिका साकारणाऱ्या तन्वी किरणने तिच्या ऑन-स्क्रीन सासूची भूमिका साकारणाऱ्या तिच्या सह-अभिनेत्री रेखा बडेबद्दल काही गोष्टी शेअर केल्या. तन्वी म्हणाली, “घरापासून दूर काम करताना, माझे सहकलाकार माझ्यासाठी दुसऱ्या कुटुंबासारखे झाले आहेत आणि रेखा बडे यांच्यासोबत माझे एक सुंदर नाते तैयार झाले आहे. शोमध्ये तिने नकारात्मक भूमिका साकारली असली तरी, ती खरोखरच एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहे. सुरुवातीला मी घरी बनवलेले जेवण मिस करायचे, पण आता, माझी सह-अभिनेत्री रेखा हिच्यामुळे ती तळमळ बंद झाली आहे. ती नेहमी आमच्यासाठी घरगुती जेवण आणते, चविष्ट लोणच्यापासून मासे, चिकन, पराठे, इडल्या आणि इतर अनेक प्रकारचे पदार्थ आणते. अश्याप्रकारे सेटवरील वातावरण आनंददायी बनवण्यासाठी ती आपले स्वतःचे प्रयत्न करते.”

Back to top button