Hotstar Showtime : इमरान हाश्मीचा 'शोटाईम'मधील हटके लूक व्हायरल, नव्या भूमिकेत अभिनेता | पुढारी

Hotstar Showtime : इमरान हाश्मीचा 'शोटाईम'मधील हटके लूक व्हायरल, नव्या भूमिकेत अभिनेता

पुढारी ऑनलाईन डेस्क : इमरान हाश्मीने टायगर ३ मध्ये खलनायकाची भूमिका साकारली, तेव्हापासून तो चर्चेचा विषय ठरला आहे. (Hotstar Showtime) खलनायकी भूमिकेने अमिट छाप सोडल्यानंतर इमरान त्याच्या चाहत्यांना अजून एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. शोटाईम या आगामी प्रोजेक्टमधील त्याचा लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेक्षकांना आता त्याच्या नव्या प्रोजेक्ट ची अपेक्षा आहे. (Hotstar Showtime)

संबंधित बातम्या –

इमरान हाश्मी त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून आगामी प्रोजेक्टमधील लूक प्रेक्षकांच्या समोर घेऊन आला आहे. त्याची ही भूमिका नक्कीच खास असणार आहे यात शंका नाही. ग्रे-बेज प्रिंटेड स्टोलसह गडद राखाडी शर्टमध्ये तो अफलातून दिसतो. शोटाईममधील त्याची झलक प्रेक्षकांमध्ये उत्कंठा वाढवते आहे यात शंका नाही.

अभिनेता नसीरुद्दीन शाह, मौनी रॉय, महिमा मकवाना, राजीव खंडेलवाल, श्रिया सरन आणि विजय राज यांच्यासोबत तो स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. प्रत्येक अभिनेत्याची झलक दिसत असताना इमरानचा लूक हा लक्षवेधी आहे. मिहीर देसाई आणि अर्चित कुमार दिग्दर्शित शोटाइम नक्कीच वेगळाच प्रोजेक्ट असणार आहे.

टायगर ३ मधील खलनायक म्हणून असलेली प्रभावी भूमिका इमरानने उत्तम साकारली आणि आता शोटाईमकडून सगळ्यांना खूप अपेक्षा आहे. या शोटाईमच्या बहुप्रतीक्षित प्रोमोचे १३ फेब्रुवारी रोजी येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

Back to top button