

rपुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची आगामी वेब सीरिज हीरामंडीचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. बऱ्याच दिवसांपासून ही सीरीज चर्चेत आहे. (Heera Mandi ) सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी शाही लूकमध्ये दिसत असून निर्मात्यांनी आज हिरामंडीचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. या फर्स्टलूकचा व्हिडिओ समोर आला असून बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री राजेशाही अंदाजात दिसत आहेत. (Heera Mandi )
संबंधित बातम्या –
हीरामंडी ही संजय लीला भन्साळी यांची पहिली वेब सिरीज असून यामध्ये हटके काही तरी पाहायला मिळणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. ही वेब सीरीज पाकिस्तानच्या रेड लाईट एरिया हीरामंडीवर आधारित आहे.
संजय लीला भन्साळींची ही वेब सीरीज नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. फर्स्ट लूकमध्ये व्हिडिओ इतर अभिनेत्री राजेशाही वेशभूषेत दिसत आहेत.