Rakul-Jackky Wedding : आता भारतातच डेस्टिनेशन वेडिंग; रकुल-जॅकीने परदेशातील लग्न केलं रद्द

rakul-jackky bhagnani
rakul-jackky bhagnani

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. (Rakul-Jackky Wedding) दोन दिवसीय हा विवाह सोहळा गोवामध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कपलने आधीच परदेशात डेस्टिनेशन वेडिंगचे नियोजन केले होते. पण, अंतिम क्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर या कपलने आपला लग्न सोहळा भारतातचं आयोजित केला आहे. (Rakul-Jackky Wedding)

संबंधित बातम्या –

रिपोर्टनुसार, लवकरच एका जवळच्या सूत्राने खुलासा केला आहे की, "रकुल आणि जॅकीने सुरूवातीला आपले लग्न मध्य पूर्वमध्ये करण्याची योजना बनवली होती. जवळपास सहा महिन्यांच्या या योजनेनंतर सर्व काही ठीक होतं. डिसेंबरमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या आव्हानानंतर रकुल आणि जॅकीने पुनर्विचार करून भारतातच डेस्टिनेशन वेडिंग ठरवलं आहे."

सूत्रांच्या माहितीनुसार, "मागील वर्षी पीएम मोदी यांनी श्रीमंत आणि दिग्गजांना आपले समारंभ, कार्यक्रमासाठी भारतात नियोजन करण्याचा आग्रह केला होता." मागील वर्षी रकुल छतरीवाला आणि आय लव्ह यू नावाच्या चित्रपटामध्ये दिसली होती. २०२४ मध्ये ती इंडियन २ सारख्या चित्रटामध्ये दिसणार आहे. हे कपल २१ फेब्रुवारीमध्ये गोवामध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news