रात्रीस खेळ चाले ३ मालिकेतून शेवंता बाहेर पडणार? | पुढारी

रात्रीस खेळ चाले ३ मालिकेतून शेवंता बाहेर पडणार?

पुढारी ऑनलाईन डेस्क

झी मराठीवरील थरारक ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेचे तिसरे पर्व (रात्रीस खेळ चाले ३) सुरु आहे. या मालिकेतील अण्णा आणि शेवतांची जोडी खूप गाजली. पण आता अण्णांची ‘शेवंता’ म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) ही मालिका सोडणार असल्याचे समजते. ‘रात्रीस खेळ चाले’मध्ये शेवंता दिसणार नसल्याच्या चर्चेने तिच्या चाहत्यांना धक्का बसलाय.

रात्रीस खेळ चाले या मालिकेने प्रेक्षकांचं अफाट प्रेम मिळवलं. अगदी पहिल्या पर्वापासूनच या मालिकेनं लोकप्रियतेचे शिखर गाठलं. या मालिकेतील सर्व कलाकार प्रेक्षकांचे अत्यंत आवडते आहेत. त्यातील एक व्यक्तिरेखा म्हणजे शेवंता (अपूर्वा नेमळेकर). अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने शेवंताची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. अपुर्वानं तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच सर्वांची आकर्षण ठरली आहे. तिसऱ्या भागातही शेवंता चर्चेत राहिली आहे.

रात्रीस खेळ चाले ३ (Ratris Khel Chale 3) या लोकप्रिय मालिकेच्या तिसऱ्या पर्वाने देखील प्रेक्षकांना टेलिव्हिजन स्क्रीनला खिळवून ठेवलंय. पहिल्या दोन पर्वासारखीच पसंती प्रेक्षक आता तिसऱ्या पर्वालाही देत असल्याचं दिसून येतंय. कारण दोन भागांची सांगड घालून रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेत अनेक रहस्य उलगडली जात आहेत.

नाईकांच्या वाड्यातल्या शुभ कार्यापासून झालेली मालिका वाड्यात वावरणाऱ्या अण्णा शेवंतांच्या अतृप्त आत्म्यापर्यंत येऊन पाहोचली. माईने आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी वाडा शेवंतांच्या ताब्यात दिला असला, तरी वाड्याबद्दल असलेली तिची आपुलकी आणि मुलांवर असलेला जिव्हाळा यामुळे माईचे प्रयत्न नक्कीच थांबलेले नाहीत.

हे ही वाचा :

 

Back to top button