Rahat Fateh Ali Khan : गायक राहत फतेह अली खान यांनी मागितली माफी | पुढारी

Rahat Fateh Ali Khan : गायक राहत फतेह अली खान यांनी मागितली माफी

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) यांनी माफी मागीतली आहे. या पाठीमागचं कारण समोर आलं आहे की, गायक राहत फतेह अली खान यांनी संतापाच्या भरात एका व्यक्तीला मारहाण केली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलं होवू लागला आहे. जाणून घ्या काय आहे प्रकरण.

Rahat Fateh Ali Khan : काय आहे प्रकरण

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलं होताना दिसत आहे. यामध्ये ते एका  एका व्यक्तीला  बेदम मारहाण करताना दिसत आहे.  बाटली बद्दल विचारपूस करताना वारंवार मारले जात आहेत. आणि थप्पड मारल्याचे दिसत आहे. आपल्याला याबाबत काहीच माहिती नाही, असे सांगून पीडित व्यक्ती राहत फतेह अली खान यांच्याकडे विनवणी करताना दिसत आहे.  व्हिडिओबाबत स्पष्टीकरण देताना राहत फतेह अली खान यांनी म्हटलं आहे की, ती व्यक्ती त्यांची शिष्य आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होवू लागला आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओवर संमिश्र कमेंट येवू लागल्या आहेत. एका वृत्तानुसार, नंतर एक माफी मागणारा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये राहत फतेह अली खान यांनी “शिक्षक आणि त्यांचा विद्यार्थी यांच्यातील वैयक्तिक बाब” आहे म्हटलं आहे. मारहाण झालेली व्यक्ती म्हणतं आहे की, ते माझे गुरुशिक्षक आहेत.  ते आमच्यावर खूप प्रेम करतात. व्हिडिओ लीक करण्याचे ज्याने हे कृत्य केले आहे ते माझ्या शिक्षकाची बदनामी करण्यासाठी ब्लॅकमेल करत आहेत.

हेही वाचा

Back to top button