Bade Miyan Chote Miyan : महाप्रलय येतोय...; अक्षय-टायगरच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' चा टिझर रिलीज (video) | पुढारी

Bade Miyan Chote Miyan : महाप्रलय येतोय...; अक्षय-टायगरच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' चा टिझर रिलीज (video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : अली अब्बास जफर दिग्दर्शित बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा आगामी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ ( Bade Miyan Chote Miyan ) हा चित्रपट लवकरच चाहत्याच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचा सध्या धमाकेदार टीझर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. यामध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा जबरदस्त अॅक्शन सीन करताना दिसत आहेत. हा टिझर सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी कौतुक करताना आपआपल्या हटके प्रतिक्रिया दिल्या आहे.

संबंधित बातम्या 

एक मिनिट ३८ सेकंदाच्या धमाकेदार ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ च्या ट्रेलरमध्ये भरपूर अॅक्शन सीन पाहायला मिळत आहेत. टिझरच्या सुरूवातीलाच ‘महाप्रलय येणार आहे, जे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य बदलेल. एक प्रलय जो चांगल्या आणि वाईट वृत्तीतील युद्ध कायमचे संपवेल. देशाचा नाश होईल. मला कोण रोखू शकेल?’ जसे भारदस्त संवाद पाहायला मिळत आहेत. याशिवाय टिझरमध्ये देशावर चालून येणाऱ्या शत्रूंचा पराभव करण्यास टिम तयार असल्याचेही दाखविण्यात आलं आहे.

दरम्यान अक्षय आणि टायगर ‘आम्ही हृदयाने सैनिक आहोत मात्र, डोक्याने सैतान आहोत. आमच्यापासून दूर राहा, आम्ही भारतीय आहोत.’ असे डॉयलॉग म्हटलं आहेत. या भारदस्त संवादामुळे सोशल मीडियावर चित्रपटाचा टिझर खूपच चर्चेत आला आहे. हा टीझर पाहून चाहते पृथ्वीराज सुकुमारन यांचे आवाजाचे कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे अक्षय कुमार आणि टायगरवर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे.

एका युजर्सने लिहिले आहे की, ‘पृथ्वीराज सुकुमारनच्या खलनायकाच्या भूमिकेबद्दल उत्सुक आहे’. ‘सध्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ च्या टीझरची चर्चा केवळ पृथ्वीराजच्या आवाजामुळे होत आहे.’ असा कॉमेन्टस सोशल मीडियावर केल्या जात आहेत. तर काही नेटकऱ्यांनी संमिश्र प्रितिक्रियाही दिल्या आहेत. दरम्यान सोशल मीडियावर हॅसटॅग #BadeMiyanChoteMiyanTeaser असा ट्रेंड करत आहे. हा चित्रपट ‘सुलतान’, ‘टायगर जिंदा है’ सारखे हिट चित्रपट बनवणारे अली अब्बास जफर यांनी दिग्दर्शित केला आहे.

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफसोबत या चित्रपटात मानुषी छिल्लर, सोनाक्षी सिन्हा आणि अलाया एफ यांच्याही भूमिका साकराल्या आहेत. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट १० एप्रिल २०२४ रोजी ईदला प्रदर्शित होणार आहे. ( Bade Miyan Chote Miyan )

Back to top button