Fighter : रिलीज आधी 'फायटर'ची ॲडव्हान्स बुकिंग, १ कोटींची तिकिट्स विक्री | पुढारी

Fighter : रिलीज आधी 'फायटर'ची ॲडव्हान्स बुकिंग, १ कोटींची तिकिट्स विक्री

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिद्धार्थ आनंदच्या ‘फायटर’ ची (Fighter ) रिलीज तारीख जवळ आली असून आता सगळ्यांना या चित्रपटाची उत्सुकता आहे. २५ जानेवारी, २०२४ रोजी जगभरातील थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज झाले आहे. रोमांचकारी हवाई सीक्वेन्स आणि उत्कृष्ट कलाकारांचा अभिनय बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. (Fighter )

संबंधित बातम्या-

१ कोटींची तिकिट विक्री

सिद्धार्थ आनंदच्या ‘फायटर’ची ॲडव्हान्स बुकिंग शनिवार, २० जानेवारीपासून सुरू झाली आहे. रव‍िवारी रात्रीपर्यंत ८७ हजारहून अध‍िक तिकिटांची विक्री झाली होती. सोमवारी रात्रीपर्यंत त्याचे १ लाख १५ हजार १८५ तिकिट विकले गेले आहेत. रिपोर्टमुसार, देशभरात सोमवारी ‘फायटर’च्या ओपनिंग डे साठी २८ हजार तिकिटांची विक्री झाली आहे. याप्रकारे चित्रपटाने आतापर्यंत ॲडव्हान्स बुकिंगमधून ३.७० कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाच्या शोजची संख्‍या देखील वाढवून आता ८ हजार ७७७ रुपये करण्यात आली आहे.

हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात अनिल कपूर, अक्षय ओबेरॉय आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचं काउन्ट डाऊन सुरू झाल असून चाहते हृतिक रोशन आणि कलाकारांना रुपेरी पडद्यावर बघण्यासाठी वाट बघत आहेत. Marflix Pictures च्या सहकार्याने Viacom18 Studios द्वारे सिद्धार्थ आनंदच्या फायटरची निर्मिती केली आहे.

Back to top button