Ram Mandir-Jackie Shroff : 'भक्ती में ही शक्ती है..' अयोध्येहून जॅकीने अनवाणी आणली रामलल्लाची मूर्ती (video) | पुढारी

Ram Mandir-Jackie Shroff : 'भक्ती में ही शक्ती है..' अयोध्येहून जॅकीने अनवाणी आणली रामलल्लाची मूर्ती (video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. काही दिवसांपूर्वी जॅकी यांचा राम मंदिराच्या पायऱ्या धुतानाचा व्हिडिओ शेअर झाला होता. या व्हिडिओतून त्याचा साधेपणा दिसून आला. यानंतर आता जॅकी श्रॉफ यांनी अयोध्येतून अनवाणी पायानं रामलल्लाची मूर्ती आणल्याने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्याचा याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ( Ram Mandir-Jackie Shroff )

संबंधित बातम्या 

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन, कॅटरिना कैफ, विकी कौशल, आलिया भट्ट, रणबीर कपूर, रोहित शेट्टी, आयुष्मान खुराना यांसारख्या अनेक स्टार्सनी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला दिमाखात हजेरी लावली होती. या सोहळ्यानंतर सर्वच स्टार्स मुंबईला परतले आहेत. मात्र, दरम्यान जॅकी श्रॉफ यांनी अयोध्येतून परतताना रामलल्लाची मुर्ती घेवून आल्याची माहिती समोर आली आहे.

नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय आणि जॅकी श्रॉफ विमानतळावर स्पॉट झाले आहेत. यावेळी जॅकी यांच्या हातात एक रामलल्लाची मुर्ती असल्याचे दिसत आहे. याच दरम्यान त्यांनी त्याच्या पायात चप्पला घातल्या नव्हत्या. यात विमान तळावर स्पॉट झाल्यानंतर पॉपाराझीच्या कॅमेऱ्याची नजर त्याच्यावर पडली. यावेळी दोघा स्टार्सनी कॅमेऱ्याला पोझ दिल्या. यानंतर जॅकी श्रॉफने रामलल्लाची मुर्ती कारमध्ये ठेवून विवेक मिठी मारली आणि विवेक त्याच्या कारकडे निघून जाताना दिसतोय. हा व्हिडिओ विरल भयानी इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे.

विमान तळावर स्पॉट झाल्यानंतर पॉपाराझीला पोझ देताना ‘जय श्री राम’ चा नाराही त्यांनी यावेळी दिला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘विवेक ओबेरॉयसोबत आपला जॅकी श्रॉफ, त्याच्या हातातील श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांची मूर्ती पाहिली आहे का?, भक्ती में ही शक्ती है 🙏✨’ असे लिहिलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह अनेकांनी त्यांच्या भक्तीचे भरभरून कौतुक केलं आहे. दरम्यान एका युजर्सने जॅकी श्रॉफचे राम भक्तीवरील प्रेम पाहून मन भरून आल्याचे म्हटलं आहे. ( Ram MandirJackie Shroff )

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, जॅकी श्रॉफने अभिनेत्री नीना गुप्तासोबत ‘मस्त में रहने का’ चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झाला होता. याशिवाय जॅकी रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात जॅकीसोबत अजय देवगण, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, अक्षय कुमार, करीना कपूर खान आणि टायगर श्रॉफ दिसणार आहेत.

(video : viralbhayani instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button