‘श्रीमद् रामायण’मध्ये पुन्हा पाहता येणार प्रभू श्रीरामांचा प्रवास | पुढारी

'श्रीमद् रामायण’मध्ये पुन्हा पाहता येणार प्रभू श्रीरामांचा प्रवास

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ मालिकेत आतापर्यंत प्रेक्षकांनी श्रीराम जन्म, गुरुकुलातून परत आल्यानंतर आपला पिता राजा दशरथाशी झालेली त्यांची भेट, त्राटिका राक्षसीशी त्याने केलेले युद्ध पाहिले आहे. आणि आता प्रेक्षक सीता-स्वयंवराचा सुंदर आणि महत्त्वाचा प्रसंग पडद्यावर अनुभवत आहेत.

संबंधित बातम्या –

अभिनेता सुजय रेऊ म्हणतो, “हा संपूर्ण कथाभाग म्हणजे एक अद्भुत अनुभव होता. आम्ही हे दृश्य खूप भव्य स्वरूपात साकारले आहे. वेगवेगळ्या भावना यावेळी प्रदर्शित झाल्या. लोकांमधील हर्षोल्लास, रामाने शिवधनुष्य भंग केल्यावर सीतेला झालेला आनंद आणि या उन्मादक वतावरणातही श्रीरामाचे गांभीर्य आणि आपल्याला प्रिय अशी अर्धांगिनी लाभल्याचा आनंद. माझ्यासाठी हा एक वेगळाच अनुभव होता. प्राची फार समजूतदार सह-कलाकार आहे. राम आणि सीता यांच्यातील प्रेमाचा परिचय देणारा एकमेकांबद्दल आदर, विश्वास आणि एकमेकांविषयीचा समजूतदारपणा साकारण्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे.”

‘श्रीमद् रामायण’ चे आतापर्यंत झालेले सर्व एपिसोड २२ जानेवारी रोजी सकाळी ९ ते रात्री ७.३० पर्यंत फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहता येणार आहे.

Back to top button