दीप्ती केतकर-नेहा जोशीच्या ‘सापळा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज | पुढारी

दीप्ती केतकर-नेहा जोशीच्या 'सापळा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : निखिल लांजेकर दिग्दर्शित आणि चिन्मय मांडलेकर, समीर धर्माधिकारी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या सापळा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. राजवारसा प्रॉडक्शनस्, मुळाक्षर प्रॉडक्शनस आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचा ‘सापळा’ चित्रपट २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला.

संबंधित बातम्या – 

बहुप्रतीक्षित मराठी थ्रिलर महाराष्ट्रभर २६ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होत आहे. त्याच्या नवीन ट्रेलरमुळे रसिकांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता ताणली गेली आहे. दोन मिनिटांच्या या ट्रेलरमधून एका गूढ खुनाची चर्चा होते. दोन लेखक, एक वर्कशॉप, रक्ताचा वास, चेहऱ्यावरील भीती, खोदलेली कबर अशा गोष्टी यातून समोर येतात आणि काहीतरी वेगळे आणि भयाण समोर येणार याची खुणगाठ प्रेक्षक बांधतो.

या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, समीर धर्माधिकारी, दीप्ती केतकर, नेहा जोशी नक्षत्र मेढेकर, सुनील जाधव यांच्या भूमिका आहेत. निखिल लांजेकर दिग्दर्शित ‘सापळा’चीकथा पटकथा आणि संवाद श्रीनिवास भणगे यांची आहे. चित्रपटाची निर्मिती प्रद्योत प्रशांत पेंढरकर, अनिल नारायणराव वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर यांची आहे.

दिग्दर्शक निखिल लांजेकर म्हणाले, “ट्रेलर आणि टीझरमधून ज्या गोष्टी समोर आल्या आहेत. त्या केवळ हिमनगाच्या टोकाएवढ्या आहेत. अजून बरेच काही प्रेक्षकांसमोर यायचे आहे. चित्रपट पाहताना प्रेक्षकांना काहीतरी वेगळे आणि अभूतपूर्व पहिल्याची अनुभूती येईल.”

Back to top button