अक्षय कुमार- टायगर श्रॉफ चमकणाऱ्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' चा टीझर 'या' तारखेला | पुढारी

अक्षय कुमार- टायगर श्रॉफ चमकणाऱ्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' चा टीझर 'या' तारखेला

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि बॉलिवूडमधील तरुण अॅक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ स्टारर “बडे मियाँ और छोटे मियाँ”च्या चर्चा जोरदार सुरू आहेत. याच दरम्यान चित्रपटाचा टीझर २४ जानेवारी २०२४ रोजी येणार असल्याचा माहिती समोर आली आहेत. २०२४ च्या ईदला हा बहुचर्चित चित्रपट येणार आहे.

संबंधित बातम्या 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा टीझर केवळ एक झलक नाही तर ‘बडे मियाँ और छोटे मियाँ’च्या सिनेमॅटिक विश्वात खळबळ माजवणार आहे. बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार आघाडीवर असून सर्वात तरुण अॅक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ या बहुप्रतीक्षित चित्रपट घेऊन येणार आहे. या दोन्ही स्टारचा “टायगर इफेक्ट” चाहत्यांना अनुभवयाला मिळणार आहे. १०० सेकंदांहून जास्त यात व्हिज्युअल ट्रीट असणार असून उच्च-ऑक्टेन अॅक्शन सीक्वेन्सचे कॅरेक्टर बिल्ड अप बघायला मिळणार आहेत.

जशी टीझर लॉन्चिंगची वेळ जवळ येत आहे तसा “टायगर इफेक्ट”ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. टायगर या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे.”बडे मियाँ आणि छोटे मियाँ” च्या पलीकडे टायगर श्रॉफचा सिनेमॅटिक प्रवास रोहित शेट्टीच्या “सिंघम अगेन” आणि रोहित धवन दिग्दर्शित “रॅम्बो” सोबत Marflix Pictures च्या अंतर्गत हा चित्रपट येणार आहे.

Back to top button