Sushant Singh Rajput : सुशांतच्या शेवटच्या सिनेमाचा येतोय सिक्वेल? | पुढारी

Sushant Singh Rajput : सुशांतच्या शेवटच्या सिनेमाचा येतोय सिक्वेल?

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवगंत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा अखेरचा सिनेमा ‘दिल बेचारा’चा सिक्वेल येणार असल्याची माहिती समोर आली आहे. दिग्दर्शक मुकेश छाबडा यांनी ट्विट करत ‘दिल बेचारा- 2’ असे लिहिले आहे. यामुळे आता या सिनेमाचा सिक्वेल येणार असल्याची चर्चा रंगली आहे. ( Sushant Singh Rajput )

संबंधित बातम्या 

सुशांतच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. 2022 मध्ये ‘दिल बेचारा’ हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. या सिनेमात अभिनेत्री संजना सांघी सुशांतसोबत झळकली होती. सुशांतसिंहच्या मृत्यूनंतर हा सिनेमा रीलिज झाला होता. ( Sushant Singh Rajput )

मुकेश छाबडा यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘दिल बेचारा-2’ या सिनेमात कोण झळकणार आहे आणि कथानकाविषयी माहिती दिलेली नाही. त्यामुळे या सिनेमात सुशांतची भूमिका कोण साकारणार, याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. सुशांतचे चाहते भावुकही झाले आहेत, तर काहींनी मात्र सिक्वेल आणायची गरज काय होती, असा प्रश्नही केला आहे.

Back to top button