पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या निधनाला तीन वर्षे उलटली झाली आहेत. परंतु, या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला नाही. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुशांत प्रकरणात ( Sushant Singh Rajput case) सीबीआयला महत्त्वाचे पुरावे मिळाली असल्याची माहिती दिली आहे.
एका मुलाखतीदरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुशांतच्या प्रकरणाबद्दल खुलासा केला आहे. यात त्यांनी सुशांतसिंह राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणी ठोस पुरावे गोळा केले जात असल्याचे म्हटलं आहे. तसेच सर्व पुरावे जमा होताच आम्ही हे प्रकरण पुन्हा न्यायाल्यात नेऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
'या प्रकरणाची सखल चौकशी सीबीआय करत आहे. सर्व पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे,. दरम्यान काही लोक म्हणाले होते की, या प्रकरणातील काही पुरावे आमच्याकडे आहेत. त्यावेळी आम्ही सांगितले की, पुरावे सादर करा, आम्ही तुमच्या पुराव्यातील तथ्य तपासतो. अशा लोकांना बोलावले असून त्यांची चौकशी केली जात आहे. काही पुरावे नोंदवले गेले आहेत आणि काही अजूनही प्रगतीपथावर आहेत. अशा परिस्थितीत निकालांवर भाष्य करणे चुकीचे आहे.' असेही ते यावेळी म्हणाले.
तर दुसकीकडे सुशांतचे चाहते त्याच्या निधनाला तीन वर्ष उलटले तरी न्याय का होत नाही?. याबद्दल तर्क- वितर्क लावत आहेत. सुशांतने १४ जून २०२० रोजी मुंबईतील त्याच्या फ्लॅटमध्ये जीवन संपवले होते. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर ड्रग्ज दिल्याचा आरोप केला होता. यानंतर रिया चक्रवर्तीला तुरुंगातही जावे लागले होते.
हेही वाचा :