Real Man Hrithik Roshan : हृतिकच्या हाती सबाचे सँडल, नेटकरी म्हणाले ‘खरा जेंटलमॅन’ | पुढारी

Real Man Hrithik Roshan : हृतिकच्या हाती सबाचे सँडल, नेटकरी म्हणाले 'खरा जेंटलमॅन'

पुढारी ऑनलाईन डेस्क : हृतिक रोशन आणि सबा आजादचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Real Man Hrithik Roshan) हा फोटो पाहून नेटकरी त्याला हाच खरा जेंटलमॅन म्हणत आहेत. हृतिकचे कौतुक होत असून तो एक चांगला बॉयफ्रेंड असण्यासोबत एक चांगला माणूसदेखील आहे, असे नेटकरी म्हणत आहेत. (Real Man Hrithik Roshan)

हृतिक रोशन-सबा आजादला मुंबईत नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) च्या ग्रँड ओपनिंगमध्ये सहभागी झाले होते. या इवेंटमधील कपलचे काही फोटोज इंटरनेटवर व्हायरल झाले. एका फोटोत हृतिक सबाचे सँडल हील्स हातात घेऊन उभारलेला दिसला. हा फोटो पाहिल्यानंतर फॅन्स हृतिकवर फिदा झाले आहेत.

फॅशन डिझायनर Amit Aggarwal ने NMACC इवेंटमधून हा फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो सबा आजाद सोबत पोझ देताना दिसत आहे. सबा रेड कलरच्या फ्युजन गाऊनमध्ये दिसतेय. ती अनवाणी दिसत असून बॅकग्राऊंडला सबाचे हील्स हातात घेऊन उभारलेला दिसतोय.

सबा-हृतिकनेही शेअर केला फोटो

हृतिक आणि सबानेदेखील सोशल मीडियावर एकत्र काही फोटोज शेअर केल्या आहेत. हृतिकने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की- ‘विथ लेडी इन रेड’. तर सबाने लिहिलं , ‘Ro आणि Sa चे नाईट आऊट!’

 

View this post on Instagram

 

A post shared by Amit Aggarwal (@amitaggarwalofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

Back to top button