पुढारी ऑनलाईन डेस्क
७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (70th National Film Awards) आज शुक्रवारी घोषणा करण्यात आली. कांतारा चित्रपटातील भूमिकेसाठी ऋषभ शेट्टी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार (Rishab Shetty wins Best Actor) जाहीर झाला आहे. तर शर्मिला टागोर आणि मनोज बाजपेयी यांची भूमिका असलेला 'गुलमोहर' सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला आहे. 'थिरुचित्रंबलम'मधील भूमिकेसाठी नित्या मेनन आणि 'कच्छ एक्सप्रेस'साठी मानसी पारेख यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर 'वाळवी'ला ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार (Vaalvi won the Best Marathi film award) मिळाला आहे.
शर्मिला टागोर यांची भूमिका असलेला 'गुलमोहर' सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट.
'कांतारा'तील भूमिकेसाठी ऋषभ शेट्टी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार.
'थिरुचित्रंबलम'मधील भूमिकेसाठी नित्या मेनन आणि 'कच्छ एक्सप्रेस'साठी मानसी पारेख यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार.
'वाळवी'ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार.
KGF Chapter 2 सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट. त्याला सर्वोत्कृष्ट स्टंट कोरिओग्राफीचाही पुरस्कार.
पोनियिन सेल्वन १- सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट.
कार्तिकेय २- सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट.
काबेरी अंतरधन- सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट.
प्रीतमला 'ब्रह्मास्त्र'साठी सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार.
अट्टम (मल्याळम चित्रपट) सर्वोत्कृष्ट चित्रपट.
नीना गुप्ता यांना 'उंचाई'मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार.
नौशाद सदर खान यांना फौजासाठी सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार