वो स्त्री है ! बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी 'स्त्री 2’ चा मोठा गल्ला

'Stree 2' day 1 collection : रिलीज दिवशीच मिळाली जोरदार ओपनिंग
stree 2 movie has become the biggest opener of this year
'स्त्री 2’ ला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद लाभला आहेPudhari
Published on
Updated on

वो स्त्री है ! कुछ भी कर सकती है... हे चेहऱ्यावर भीतीचे हावभाव आणून सांगणारे पंकज त्रिपाठी सगळ्यांनाच आठवत असतील. आता मागच्या सिनेमापेक्षाही पुन्हा एकदा हसवत हसवत घाबरवण्यासाठी स्त्री 2 सज्ज झाला आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव अभिनीत 'स्त्री 2’ ला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद लाभला आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी गदर 2 च्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनला मागे टाकले आहे. बुधवारी काही निवडक ठिकाणी स्त्री 2 प्रदर्शित झाला. तर गुरुवारी तो सगळीकडे प्रदर्शित झाला. या सिनेमाने या दोन्ही दिवसात 54.35 कोटी कमावले आहेत. अमर कौशिक यांचे दिग्दर्शन असलेला हा सिनेमा या वर्षातील सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. त्याने हृतिक - दीपिकाच्या 'फायटर' ला मागे टाकले आहे. फायटरने पहिल्याच दिवशी 24.6 कोटींचा गल्ला जमवला होता.

पहिल्या दिवशी स्त्री 2 ला प्रेक्षकांनी जास्त पसंती
पहिल्या दिवशी स्त्री 2 ला प्रेक्षकांनी जास्त पसंतीPudhari

स्त्री सोबत जॉन अब्राहमचा 'वेदा' आणि अक्षय कुमारचा 'खेल खेल मे' ही रिलीज झाला आहे. या दोन पेक्षा पहिल्या दिवशी स्त्री 2 ला प्रेक्षकांनी जास्त पसंती दिल्याचे दिसून येत आहे. दिनेश विजन यांच्या हॉरर कॉमेडी युनिव्हर्सचा हा सिक्वेल आहे. यापूर्वी स्त्री ने ही चांगला गल्ला जमवत प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news