पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रशांत नीलच्या केजीएफ नंतर सालारने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केलीय. प्रभास-पृथ्वीराज सुकुमारन यांची बॉन्डिंग आणि खानसार साम्राज्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. इतकेच नाही तर शाहरुख खानच्या डंकीला मागे टाकत सालारने कलेक्शनच्या बाबतीत प्रचंड धुमाकूळ घातला आहे. (Salaar Collection) २०२३ च्या शेवटच्या वीकेंडवर सालार बॉक्स ऑफिस कलेक्शन आठव्या दिवशीदेखील चांगले ठरले आहे. (Salaar Collection)
शुक्रवारी प्रभासच्या सालारने १०.२३ कोटींचे कलेक्शन केले आहे. त्यानंतर भारतातील सालारचे कलेक्शन ३१८.२३ कोटी झाले आहे. हा वर्ल्डवाईड ही आकडा ४६८.५ कोटी पार झाला आहे. इंडिया ग्रॉस ३६३.५ कोटींचे कलेक्शन झाले आहे. डंकीविषयी भारतात शाहरुख खानच्या चित्रपटाचे कलेक्शन १६७.४७ कोटी झाले. वर्ल्डवाईड कमाई ३१७.२५ कोटी झाली आहे. इंडिया ग्रॉस १९२.२५ कोटींवर पोहोचले आहे.
सालारच्या सात दिवसांची कमाई पाहिली तर पहिल्या दिवशी ९०.७ कोटींचे ओपनिंग केले होते. दुसऱ्या दिवशी ५६.३५ कोटी, तिसऱ्या दिवशी ६२.०५ कोटी, चौथ्या दिवशी ४६.३ कोटी, पाचव्या दिवशी २४.९ कोटी, सहाव्या दिवशी १५.६ कोटी, सातव्या दिवशी १२.१ कोटींची कमाई प्रभासच्या चित्रपटाने केली होती. त्यानंतर आठवड्याभरातील कलेक्शन ३०८ कोटी पार झाले आहे.