प्रसिद्ध दिग्दर्शक प्रशांत नारायणन यांचे निधन | पुढारी

प्रसिद्ध दिग्दर्शक प्रशांत नारायणन यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिणात्य प्रसिद्ध दिग्दर्शक प्रशांत नारायणन यांचे गुरुवारी निधन झाले. शासकीय रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 51 वर्षांचे होते. त्यांच्या फुफ्फुसाच्या आजारावर उपचार सुरू होते.

नारायणन यांनी दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते मोहनलाल यांच्यासोबत ‘छायामुखी’ चित्रपटात काम केले आहे. त्यामुळे त्याची ख्याती राज्यभर पसरली. तीन दशकांहून अधिक काळ नाट्यविश्वात आपली छाप सोडणाऱ्या नारायणन यांनी जवळपास ६० नाटकांचे दिग्दर्शन केले होते. त्यांनी अनेक नाटके लिहिली आहेत. नारायणन यांनी ‘मणिकर्णिका’, ‘ताजमहाल’ आणि ‘कारा’ यांसारख्या अनेक प्रसिद्ध नाटकांचे दिग्दर्शनही केले होते.

नारायणन यांना 2003 मधील सर्वोत्कृष्ट नाट्यलेखनासाठी केरळ संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

राज्याने एक प्रतिभावान कलाकार गमावला आहे. गेल्या तीन दशकांमध्ये रंगभूमी मंचावर आपली छाप सोडली आहे, अशी शोकभावना केरळचे सांस्कृतिक कार्यमंत्री साजी चेरियन यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा 

Back to top button