८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी – शुभंकर तावडेचं ‘एन्जॉय एन्जॉय’ गाणं भेटीला | पुढारी

८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी - शुभंकर तावडेचं 'एन्जॉय एन्जॉय' गाणं भेटीला

पुढारी ऑनलाईन डेस्क – ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाचं एन्जॉय एन्जॉय हे धमाल गाणं लाँच करण्यात आलं Eus. शुभंकर तावडे, प्रियंका जाधव या गाण्यात आहेत. ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! हा चित्रपट नव्या वर्षात १९ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.

संबंधित बातम्या –

उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे विकास हांडे, लोकेश मांगडे, सुधीर कोलते यांनी ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. शर्वाणी – सुश्रुत यांनी चित्रपटाच्या पटकथालेखनाची, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे.

अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांच्यासह शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे – विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी असे उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटात आहेत. अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये ९० पेक्षाही अधिक पुरस्कार मिळवण्याची दमदार कामगिरी या चित्रपटाने केली आहे.

८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! हा चित्रपट एका महत्त्वाच्या विषयावर बेतला आहे. एन्जॉय एन्जॉय हे गाणं आयुष्य साजरं करण्याचा संदेश देते. गणेश निगडे यांनी लिहिलेल्या या गाण्याला सुहित अभ्यंकर यांनी संगीतबद्ध केलं आहे. तर आदर्श शिंदे आणि सुहित अभ्यंकर यांनी हे गाणं गायलं आहे. प्रत्येकाला ठेका धरायला लावणारं हे गाणं आहे.

Back to top button