बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री पैकी एक अभिनेत्री म्हणजे प्रिती झिंटा (Preity Zinta). नुकतीच ती सरोगसीच्या मदतीने (Bollywood Surrogate Parents) दोन जुळ्या मुलांची आई झाली आहे. तिच्या या जुळ्या मुलांची नावे जय आणि जिया असून, तिने ही गुड न्यूज आपला आणि आपल्या पतीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपल्या चाहत्यांना दिली. तिच्यावर चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.