पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा 'डंकी' चा चित्रपट गेल्या आठवड्यात २१ डिसेंबर २०२३ रोजी पडद्यावर रिलीज झाला. रिलीज होताच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली. दरम्यानच दुसऱ्या दिवशी साऊथ स्टार प्रभासचा 'सालार' चित्रपट शाहरूखच्या 'डंकी'ला टक्कर देण्यास सज्ज झाला. यामुळे दोन्ही चित्रपटात 'सालार' नं बाजी मारली. आणि हळूहळू 'डंकी' च्या कमाईचे आकड्यामध्ये घसरण होत गेली. मात्र, 'डंकी'ने बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली आहे. उलट त्याने हळूहळू चाहत्यांना आपल्याकडे खेचत जवळपास २५० कोटींच्या घरात पोहोचला आहे. ( Dunki Box Office Collection )
संबंधित बातम्या
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता शाहरूखच्या 'डंकी' चित्रपटाने पहिल्या दिवशी देशात २९.२ कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी २० कोटी, तिसऱ्या दिवशी २४. ५ कोटींच्या घरात पोहोचला. यानंतर चित्रपटाने चौथ्या दिवशी २९ कोटी, पाचव्या दिवशी २२.५० कोटींची भरघोस अशी कमाई केली आहे. तर आज मंगळवारी सहाव्या दिवशी या चित्रपटाने २० ते २२ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. या चित्रपटाने आतापर्यंत एकूण सहा दिवसांत सुमारे १५० कोटींची भरघोष अशी कमाई केली आहे.
दरम्यान शाहरूखच्या 'डंकी' नं जवळपास वर्ल्डवाईड २५० कोटींचा आकडा पार केला आहे. मात्र, 'डंकी' हा चित्रपट शाहरुखच्या आधीच्या रिलीज झालेल्या 'पठाण' आणि 'जवान' कमाईच्या बाबतीत खूपच मागे पडला आहे. 'जवान' हा या वर्षातील टॉप ओपनिंग चित्रपट ठरला आहे. 'जवान' ने पहिल्या दिवशी ६५. ५ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर 'पठाण' चित्रपट आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशीचे बॉक्स आफिसवर ५५ कोटी रुपयांचे कलेक्शन केलं होतं.
'पीके', 'मुन्नाभाई एमबीबीएस' आणि '३ इडियट्स' यासारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी 'डंकी' चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. 'डंकी' देशात चार हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. 'डंकी' या चित्रपटाचे १२० कोटी बजेट आहे. दरम्यान १२० कोटीच्या बजेटच्या चित्रपटाने २५० कोटी मिळवल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. ( Dunki Box Office Collection )