पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही आणि चित्रपट अभिनेता रोनित रॉय यांनी त्यांची पत्नी नीलम सिंहसोबत पुन्हा सात फेरे घेतले. अभिनेत्याच्या २० व्या लग्नाच्या वाढदिनी गोव्यातील एका मंदिरात पुन्हा एकमेकांना वरमाला घातली. सात फेरे घेत एकमेकांना साथ देण्याची शपथ घेतली. यावेळी त्यांचा १६ वर्षीय मुलगा अगस्त्य देखील उपस्थित होता. (Ronit Roy Wedding) रोनित रॉय आणि नीलम दोघांनी इन्स्टाग्रामवर खूप खास क्षणांचे व्हिडिओज शेअर केले आहेत. यामध्ये दोघे लिप किस करताना दिसत आहेत. (Ronit Roy Wedding)
टीव्हीचे 'मिस्टर बजाज' रोनित रॉय हे हिंदीसोबतच बंगाली चित्रपटांचे प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे. रोनित यांनी जो व्हिडिओज शेअर केले आहेत, त्यामध्ये ते पत्नी नीलम सोबत विधींमध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. यामध्ये बंगाली लग्नातील रीत शुभो दृष्टीदेखील आहे. रोनित रॉय यावेळी पांढऱ्या शेरवानी आणि लाल दुपट्टामध्ये दिसत आहेत. तर नीलम लग्नाच्या लाल जोड्यात सुंदर दिसत होती.
रोनितने असे तीन व्हिडिओज शेअर केले आहेत. या फोटोंना कॅप्शन लिहिलंय-'माझ्याशी लग्न करशील? पुन्हा?' दुसऱ्या व्हिडिओला म्हटलंय, 'आमच्या शपथांना पुन्हा नवं करायचं आहे : भाग २'. तिसऱ्या व्हिडिओला कॅप्शन लिहिलीय- 'दुसऱ्यांदाच काय तर हजार वेळा लग्न तुझ्याशीच करेन! माझं प्रेम, तुला लग्नाच्या २० वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.'