

पुढारी ऑनलाईन : भारतीय वंशाचा प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन नील नंदा याचे वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी निधन झाले आहे. नील नंदाने हल्लीच त्याचा ३२ वा वाढदिवस साजरा केला होता. "जिमी किमेल लाइव्ह" आणि कॉमेडी सेंट्रलच्या "अॅडम डेव्हान्स हाऊस पार्टी" मधून त्याने स्टँडअप कॉमेडियन म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याच्या अचानक जाण्याने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
त्यांचा मॅनेंजर ग्रेग वेइस याने व्हरायटी या एंटरटेनमेंट वेबसाइटकडे नील नंदाच्या निधनाची पुष्टी केली आहे. त्याने म्हटले आहे की तो एक "लोकप्रिय कॉमिक" आणि "मोठा माणूस" होता. मी त्याला १९ वर्षांचा असल्यापासून ओळखतो. पण त्याने नील नंदाच्या मृत्यूचे कोणतेही कारण सांगितले नाही.
नंदाने २०१७ मध्ये "जिम्मी किमेल लाइव्ह"वरील ५ मिनिटांच्या कार्यक्रमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. कॉमेडी सेंट्रलच्या "अॅडम डिव्हायन्स हाऊस पार्टी" सोबतही त्याने काम केले. तो व्हाइसलँडच्या "फ्लॉपहाउस" आणि हुलूच्या "कमिंग टू द स्टेज"मध्येही दिसला होता.
२०१८ मध्ये नंदा याने व्हीसी रिपोर्टरला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, "आतापर्यंतची कॉमेडीमधील माझी सर्वात अभिमानास्पद कामगिरी म्हणजे 'जिमी किमेल लाइव्ह'वर सादरीकरण करणे.
नील नंदाचे आई- वडील मूळ भारतीय वंशाचे आहेत. त्याचा जन्म अटलांटा येथे झाला होता. त्याला लहानपणापासून कॉमेडी करण्याची आवड होती. शाळेत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो कॉमेडी करायचा.
हे ही वाचा :