Prabhas Salaar Review : अंगावर शहारे आणणारा…; प्रभासचा धमाकेदार अॅक्शन सीनसह ‘सालार’ प्रदर्शित | पुढारी

Prabhas Salaar Review : अंगावर शहारे आणणारा...; प्रभासचा धमाकेदार अॅक्शन सीनसह 'सालार' प्रदर्शित

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ स्टार प्रभासचा धमाकेदार ‘सालार’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने याआधीच दोन दिवंसापासून अॅडव्हान्स बुकिंगला सुरूवात करून भरघोस अशी कमाई केली आहे. याशिवाय हा चित्रपट बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानच्या काल रिलीज झालेल्या डंकी चित्रपटाला टक्कर देत आहे. दरम्यान या चित्रपटातील प्रभासच्या अभिनयाचे खूपच कौतुक झाले. दुसरीकडे चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. ( Prabhas Salaar Review )

संबंधित बातम्या

प्रभासचा ‘सालार’ हा चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर म्हणजे, शुक्रवारी २२ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. हा चित्रपट रिलीज होताच चाहत्यांनी पहाटेपासून थिअटरमध्ये गर्दी जमली होती. पहिल्या शो रिलीज झाल्यानंतर प्रभासच्या चाहत्यांनी फटाक्याची आतषबाजी करून मोठा जल्लोष साजरा केला. दरम्यान सोशल मीडियावर ‘सालार’ची क्रेझ पाहायला मिळत आहे. तर काही चाहत्यांनी चित्रपटाचे कौतुक करताना हटके कॉमेन्टस केल्या आहेत. ( Prabhas Salaar Review )

Prabhas Salaar Review
Prabhas Salaar Review

प्रभाससोबत चित्रपटामध्ये अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन, जगपती बाबू आणि श्रुती हासन यांनी भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट देशभरात ६ हजार स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. त्याच्या शोची संख्या १२ हजारांपेक्षा कमी आहे. दरम्यान सालारने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये ४८.९४ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. या चित्रपटाची २२ लाख ३८ हजार ३४६ तिकिटे विकली गेली आहेत. ‘सालार’ चे एकूण बजेट ४०० कोटी रुपयांचे आहे. मात्र, यावेळी काल म्हणजे, गुरूवारी दि. २१ डिसेंबरला रिलीज झालेला शाहरुख खानचा ‘डंकी’ ४ हजार स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे शो १५ हजारांहून अधिक झाले आहेत.

चित्रपट पडद्यावर प्रदर्शित होताच चाहत्यांनी आपआपल्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान काही युजर्सनी लिहिले आहे की, ‘बाहुबली परत आला आहे’. ‘कोणताही गोंधळ नाही’. ‘अंगावर शहारे लाणणारा चित्रपट’, ‘जास्त अपेक्षा करू नका’. ‘जा आणि थिएटरच्या अनुभवाचा आनंद घ्या’. ‘बोलण्यासारखे फार काही नाही’. ‘चित्रपटात भरपूर अॅक्शन, सरप्राईज, ट्विस्ट आणि टर्न्स आहेत’. ‘भारतीय सिनेमाचे हे सर्वात मोठे कमबॅक आहे’. ‘धमाकेदार चित्रपटाचे सर्व विक्रम मोडले जातील’. ‘प्रभासच्या चाहत्यांमुळे सकाळचे सगळे शो फुल्ल आहेत’. ”सालार’ हा चित्रपट बघायलाच हवा’. असे म्हटलं आहे. तर आणकी एका युजर्सने प्रभासच्या चित्रपट आणि अभिनय फालतू असल्याचे म्हटलं आहे. याशिवाय सोशल मीडियावर अनेक चाहते वेगवेगळ्या संमिश्र प्रतिक्रिया दोत आहेत.

Back to top button